आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जाहीरनाम्यातील कळीची आश्वासने दूरच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने अापला जाहीरनामा प्रकाशित करताना सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करण्याच्या हेतूने विविध अाश्वासने दिली हाेती. जाहीरनाम्यातील एकूण २३ अाश्वासनांपैकी दाेन वर्षांच्या काळात केवळ ३ अाश्वासनांची पूर्तता झाली असून चार अाश्वासनांच्या पूर्तीची प्रक्रिया सुरू अाहे. उर्वरित १६ अाश्वासनांना मात्र अद्याप हात देखील घालण्यात अाल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे स्वस्त इंधन, महिलांसाठी माहेरचा अाधार, वयाेवृद्ध शेतकऱ्यांसाठी अन्नदाता अाधार, कृषी उत्पादन सुरक्षा निधी अादी कळीची अाश्वासने अजूनही पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचे दिसते.

भाजपने ११ अाॅक्टाेबर २०१४ ला राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते ‘दृष्टिपत्र २०१४’ हा जाहीरनामा प्रकाशित केला. त्यापैकी लाेेकसेवा हमी कायदा व उद्याेगांसाठी मैत्री कक्ष या दाेन याेजना सरकारने हाती घेऊन अंमलबजावणीही केली. एक खिडकी याेजनाही सुरू झााली. त्यामुळे खेटे वाचले असले तरी अजूनही अपेक्षित वेळेत कामे हाेत नसल्याच्या तक्रारी अाहेत.

मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात अाली. तर ठिबक सिंचनाला ५० टक्के अनुदान, खाेरेनिहाय जलसिंचन याेजना अशी काही अाश्वासने प्रगतिपथावर अाहेत. परंतु ग्रामीण भागासाठी असलेल्या याेजना केवळ जाहीरनाम्यातच बंद आहेत. त्यात अादिवासींना साैरकंदील देण्याची अंधारमुक्त याेजना, अादिवासींसाठी पाणी शुद्धीकरणशासाठी फिल्टर्स, साखर उत्पादक शेतकऱ्यांना कल्याणकारी याेजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षा याेजना यासह सिंचनाचे उपायही दाेन वर्षांत केलेले नाहीत. मराठी भाषेच्या प्रचार अाणि प्रसारासाठी याेजनांची या जाहीरनाम्यात भर हाेती. मात्र मराठी शाळांची पूर्तता, डिजिटल मराठी प्राेत्साहन याेजनांकडे अाजही सरकारने पाहिलेदेखील नाही.
याविषयी खा. सहस्रबुद्धे यांना छेडले असता त्यांनी ‘दीर्घकालीन उपाययाेजना अाणि अपेक्षांची पूर्तता यात अाम्ही कमी पडणार नाही’ अशी ग्वाही दिली.
बातम्या आणखी आहेत...