आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत भाजपची ‘डबल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार सीमा हिरे गटाकडून बाळासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या सत्कारप्रसंगी पदाधिकारी कार्यकर्ते.
सिडको - सिडको भाजप मंडल अध्यक्षपदाच्या निवडीप्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार अपूर्व हिरे यांच्या समर्थकांच्या गटांत जोरदार हमरीतुमरी होऊन प्रचंड गदारोळ झाला. दोन्ही गटांनी वेगवेगळा अध्यक्ष जाहीर केल्याने सिडको मंडलला दोन अध्यक्ष लाभले असून, संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडीवेळी उभय बाजूंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निकिता मंगल कार्यालयात निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. बाळासाहेब पाटील, गिरीश (गिरिधर) भदाणे, यशवंत नेरकर, उखा चौधरी प्रकाश अमृतकर पदाच्या शर्यतीत होते. आमदार अपूर्व हिरे गटाकडून भदाणे आमदार सीमा हिरे गटाकडून बाळासाहेब पाटील यांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आली होती. वरिष्ठ पातळीवरून भदाणे यांची निवड झाल्याची घोषणा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केली. पक्षनिरीक्षक म्हणून संभाजी मोरुस्कर यांनी काम पाहिले. आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, गोपाळ पाटील, कैलास आहिरे, प्रदीप पेशकार, जगन पाटील, बाळासाहेब पाटील, नगरसेवक सतीश सोनवणे, सुरेश पाटील, अलका आहिरे, डॉ. मंजूषा दराडे, ललिता भावसार, माधवी मोराणकर आदी उपस्थित होते.

सत्कार दोन्हींकडे...
भदाणे यांची निवड जाहीर होताच आमदार सीमा हिरे समर्थकांनी घोषणाबाजी करीत विरोध केला. आमदार अपूर्व हिरे यांनी समर्थकांसह बैठकीतून काढता पाय घेत पवननगर येथे भदाणे यांचा सत्कारही केला. दुसरीकडे, निवड प्रक्रियेच्या ठिकाणीच आमदार सीमा हिरे यांनी समर्थकांसह ठिय्या मांडत बाळासाहेब पाटील यांची तेथेच अध्यक्षपदी निवड जाहीर करीत त्यांचा सत्कार केला.

निवडीतून पक्षाने न्याय दिला...
ही निवड पक्षातील सदस्यांच्या पाठिंब्यानेच झाली आहे. गिरीश भदाणे यांनी सदस्यता नोंदणीत मोठा सहभाग घेतला. त्यांचे काम पाहूनच निवड करण्यात आली आहे. पक्षाने काम करणाऱ्याला न्याय दिला आहे. डॉ. अपूर्व हिरे, आमदार

पक्षादेश महत्त्वाचा...
सिडको मंडल अध्यक्ष निवडीवर प्रदेशाध्यक्षांनी शिक्कामोर्तब केले. अपेक्षा सर्वांनाच असते, सर्वांचा सन्मान राखू. ही सर्वसमावेशक निवड आहे. लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष,भाजप

पक्षाशी संबंध नसलेल्यांची निवड
भाजपशी काहीही संबंध नसलेल्या, कोणतेही पक्षकार्य केलेल्या व्यक्तीची निवड चुकीची आहे. २५ वर्षांपासून पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्यांची पक्षश्रेष्ठींनी निवड करायला हवी. सीमा हिरे, आमदार
सिडको भाजप मंडल अध्यक्षपदी आमदार अपूर्व हिरे गटाकडून गिरीश भदाणे यांची निवड झाल्यावर त्यांचा सत्कार करण्यात आला.

चुकीचा निर्णय
स्थानिक पातळीवर कोण पक्षासाठी काम करते, याचा विचार करून निवड व्हायला हवी. वरिष्ठ पातळीवर चुकीची माहिती पाठवून चुकीचा निर्णय घेतला जातो. जगन पाटील, माजी मंडल अध्यक्ष