आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाेय, भाजपसाठी पैसे घेतले; भाजप नाशिक शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उमेदवारांकडून दाेन लाख रुपये घेतल्याचा व्हायरल झालेला व्हिडिअाे सत्यच असल्याची कबुली देत भाजप शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप यांनी तिकिटासाठी नव्हे, तर पक्ष प्रचारासाठी इच्छुकांकडून एेपतीप्रमाणे पैसे घेतल्याचा खुलासा निवडणूक अायाेगाच्या अाचारसंहिता कक्षाकडे केला अाहे. मात्र, या कबुलीजबाबामुळे भाजपची अडचण वाढणार असून किती जणांकडून किती पैसे घेतले, याची यादीच प्रशासन मागवणार अाहे.

महापालिका निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे नाशिक भाजपमध्ये अाराेप- प्रत्याराेपांच्या फैरी झडत अाहेत. पक्षनिधीत पैसे देऊनही तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी थेट शहरप्रमुखांनी पैसे मागितल्याचे फुटेज साेशल मीडियात व्हायरल केले. त्यामुळे भाजपची बदनामी झाली. भाजप कार्यालयात नाना शिलेदार हे इच्छुकांकडून दाेन लाख रुपये मागत असल्याचा हा  व्हिडिअाे व्हायरल झाला. त्यानंतर अामदार देवयानी फरांदे व गाेपाळ पाटील यांच्यासमाेर कार्यकर्ते दहा लाख रुपये घेऊनही तिकीट देत नसल्याचा व्हिडिअाेही व्हायरल झाला. 
 
त्यामुळे भाजपचा पाय अाणखी खाेलात गेला. दरम्यान, याप्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अाहेर यांनी निवडणूक अायाेगाकडे भाजपविराेधात अाचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. त्यानंतर अायाेगाने भाजप शहराध्यक्ष सानप यांना नाेटीस बजावून खुलासा मागवला. सानप यांनी नुकताच खुलासा सादर केला अाहे. पक्षनिधीसाठी ज्यांची एेपत अाहे त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे त्यांनी कबूल केले अाहे. मात्र, उमेदवारीशी याचा संबंध नव्हता व काेणावरही पैसे द्याच अशी सक्ती केली नव्हती, असेही सानप यांनी स्पष्ट केले.  
बातम्या आणखी आहेत...