नाशिक- रविवार पेठेसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात बुधवारी (दि. 16) पहाटे चोरट्यांनी सहा दुकाने फोडून धाडसी चोरी केल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याचा आरोप करत शनिवारी सकाळी भाजपतर्फे रविवार कारंजा येथे आंदोलन करण्यात आले.
भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, प्रदेश पदाधिकारी नगरसेविका सीमा हिरे, उपमहापौर सतीश कुलकर्णी, माजी उपमहापौर बाळासाहेब सानप, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद भूमकर, मयूर सराफ, नीलेश बोरा, माजी उपमहापौर देवयानी फरांदे, सुहास फरांदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.
रविवार कारंजा परिसरात बुधवारी झालेल्या चोरीच्या या घटनेबाबत व्यापार्यांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे, त्याचीच परिणती या आंदोलनाच्या रूपाने पाहायला मिळाली. ही चोरी होऊन चार दिवस उलटले तरीही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला संबंधित आयशर ट्रकही सापडलेला नाही. यापूर्वी या परिसरात झालेल्या चोर्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊनही चोरट्यांना पकडण्यात पोलिस सपशेल अपयशी ठरले आहेत. चोरीच्या वाढत्या घटना रोखण्यात पोलिसांना येत असलेल्या अपयशाच्या मुद्यावर भाजपच्या व्यापार आघाडीने पोलिस यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी हे आंदोलन केले. येत्या तीन दिवसांत चोरटे सापडले नाहीत तर शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना घेराव घालण्याचा इशारा या वेळी भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी दिला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस यंत्रणेविरोधात घोषणाबाजी करून राज्याच्या गृह विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढले. या आंदोलनात व्यापार आघाडीचे प्रकाश दीक्षित, आशिष नहार, ‘फाम’चे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती, जयंत चांदवडकर यांसह व्यापारी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
पोलिस यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
पोलिसांचा गुन्हेगारांना धाक उरलेला नाही, असे या चोरीच्या घटनेतून सिद्ध होत आहे. चार दिवस उलटूनही पोलिसांना चोर सापडत नाहीत आणि ट्रकही सापडत