आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची महाभरती; उद्धव निमसे, कुंभारकर यांचा पक्षप्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : एसटी महामंडळात हाेणाऱ्या महाभरती सारखीच भरती भाजपमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली असून, मंगळवारी (दि. १०) काँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश खेताडे, संजय माधवराव पाटील, तसेच मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचवटीत प्रवेशाचा हा साेहळा रंगला. 
 
यावेळी अापल्या भाषणात पालकमंत्री महाजन म्हणाले की, नाशिक शहरात मनसेचे नगण्य नगरसेवक उरले अाहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे अस्तित्व उरले नाही. शिवसेनेबराेबर स्थानिक पातळीवर युतीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. 
 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सेनेत ‘इनकमिंग’ सुरू अाहे तर दुसरीकडे मनसे, राष्ट्रवादी अाणि काँग्रेसमध्ये ‘अाऊटगाेइंग’ सुरू अाहे. अाजवर मनसेचे सर्वाधिक नगरसेवक अन्य पक्षांत गेले असून, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागताे. दीड वर्षापूर्वी काँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील हे नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपकडून निवडून अाले हाेते. तर, त्यांची पत्नी नगरसेविका लता पाटील यांनीदेखील काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. 
 
याशिवाय नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, कन्हैया साळवे वैशाली भागवत यांनीही काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली अाहे. हीच मालिका कायम ठेवत नगरसेवक उद्धव निमसे यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे माजी खासदार माधवराव पाटील यांचे चिरंजीव संजय पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसप्रमाणेच मनसेचीही गळती सुरूच असून, सध्याच्या प्रभाग क्रमांक चे नगरसेवक रुची कुंभारकर हेदेखील भाजपमय झाले. 
 
राष्ट्रवादीचे पहिले नगरसेवकही भाजपत 
दुसऱ्या पंचवार्षिक काळात तत्कालीन नगरसेवक लक्ष्मण मुकणे यांच्या निधनानंतर सुरेश खेताडे यांनी पाेटनिवडणुकीत विजय मिळविला हाेता. त्यापूर्वी काही महिने अाधीच राष्ट्रवादीची स्थापना झालेली असल्याने ते या पक्षाचे पहिले नगरसेवक ठरले. त्यांनीही मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. 

अशी बदलणार समीकरणे 
सध्याच्याप्रभाग क्रमांक मधून नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणारे उद्धव निमसे हे नवीन रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक अाहे. मंगळवारी झालेल्या प्रवेशामुळे भाजपचे पॅनल सक्षम झाले अाहे.
 
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुरेश खेताडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला अाहे. त्यांच्यासह माळाेदे, डाॅ. अनिता लभडे, माळाेदे यांच्या प्रवेशामुळे विराेधकांसमाेर माेठे अाव्हान उभे ठाकले अाहे. दुसरीकडे मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकर नवीन रचनेनुसार प्रभाग मधून इच्छुक असून, त्यांच्या प्रवेशामुळे या प्रभागातील मनसे खिळखिळी बनली अाहे. तर प्रभाग क्रमांक मधून संजय पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याने अनाेखी अाघाडी करण्याचे मनसुबे रचणाऱ्यांना माेठा धक्का बसण्याची चिन्हे अाहेत.