Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | BJP 'powerful' rally postponed

भाजपचा ‘पाॅवरफुल’ मेळावा लांबणीवर, दानवेंच्या दुखावलेल्या पायाचेही झाले कारण

प्रतिनिधी | Update - Dec 26, 2015, 09:22 AM IST

मनसेतील सहा-सात समर्थक नगरसेवकांना भाजपमध्ये दाखल करून स्वत:चे वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना ‘ब्रेक’ लावण्यात भाजपचे दाेन अामदार मनसेच्या मुंबईतील नेत्यांना अखेर यश अाले अाहे.

 • BJP 'powerful' rally postponed
  नाशिक; मनसेतील सहा-सात समर्थक नगरसेवकांना भाजपमध्ये दाखल करून स्वत:चे वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना ‘ब्रेक’ लावण्यात भाजपचे दाेन अामदार मनसेच्या मुंबईतील नेत्यांना अखेर यश अाले अाहे. तूर्तास प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दुखऱ्या पायाचे निमित्त देत रविवारी हाेणारा ‘पाॅवरफुल’ प्रवेश साेहळा लांबणीवर टाकण्यात अाला अाहे.

  महापालिका निवडणूक वर्षभरावर अाली असून, यानिमित्ताने अापले स्थान मजबूत करण्यासाठी मनसेतील माजी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये समर्थक नगरसेवकांना दाखल करून घेण्यासाठी शक्ती पणाला लावली हाेती. गेल्या अाठवड्यात प्रथम मनसेचे पंधरा नगरसेवक भाजपात जातील, अशी हवा सांगितली जात हाेती. मात्र, जसजसा प्रवेश साेहळ्याला विलंब हाेऊ लागला तसतशी नगरसेवकांची संख्याही कमी हाेत गेली. प्रामुख्याने भाजपमध्ये गेलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांचे प्रभावी पुनर्वसन नसणे, सर्वेक्षण पद्धतीमुळे उमेदवारी मिळण्याबाबत संभ्रम अशी कारणे सांगितली जाऊ लागली. अखेर सात ते अाठ नगरसेवकांच्या प्रवेशाच्यानिमित्ताने रविवारी मुंबई नाका येथील एका लाॅन्सवर कार्यक्रम घेण्याचे निश्चित झाले हाेते.
  मुख्यमंत्री नुकतेच अधिवेशन संपल्यामुळे व्यस्त असल्याचे कारण देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम हाेणार हाेता. दरम्यान, अाता दानवे यांचा पाय दुखावल्यामुळे साेहळा पुढे ढकलल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीप्रमाणे मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपासून वरिष्ठ नेत्यांकडे अशा पद्धतीने पक्षाला सुरुंग लावण्यासाठी हाेत असलेल्या प्रयत्नाबाबत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. सत्तेत असताना मनसेसारख्या अाक्रमक पक्षाची उगाच नाराजी नकाे म्हणूनही या फाेडाफाेडीला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच तूर्तास पूर्णविराम दिल्याचे सांगितले जाते. पक्षातील सूत्रांच्या माहितीप्रमाणे नववर्षात हा साेहळा हाेण्याची शक्यता अाहे.

  प्रतिष्ठेमुळे तापले ‘राज’कारण.
  माजी पदाधिकाऱ्यांनी मनसेला जाेरदार धाेबीपछाड देण्यासाठी सर्वपद्धतीने नगरसेवकांना गळाला लावण्याबाबत केलेल्या प्रयत्नामुळे राजकारण तापल्याची चर्चा अाहे. जणू ही प्रतिष्ठेची लढाई झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातून मुंबईतून खुद्द राज ठाकरे यांनी सूत्रे हलवल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांशी त्यांची जवळीक दुसरीकडे भाजपमधील स्थानिक अामदारांचा नाराजीचा सूर बघता तूर्तास थंड करून खायचे असे धाेरण स्वीकारले गेल्याचे समजते.

  भाजपमध्ये अामदारांची एकी
  रविवारी हाेणाऱ्या साेहळ्याचे श्रेय मनसेचे माजी पदाधिकारी घेण्याची शक्यता गृहीत धरून दाेन अामदारांनी एकत्र येत स्वतंत्र कार्यक्रम घेण्याची मागणी केल्याचे वृत्त अाहे. या अामदारांच्या संपर्कात अन्य पक्षाचे नगरसेवक असून, प्रत्यक्षात त्यांना विचारात घेता कार्यक्रमाची रचना झाल्याने ते दुखावल्याचे सांगितले जाते. पंधरा वर्षांनंतर सत्ता मिळाल्याने भाजपमध्ये काम करणाऱ्या निष्ठावंतांची नाराजीही अामदारांना एकत्र अाणण्यास भाग पडल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

Trending