आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Nitin Gadkari And MNS Chief Raj Thackeray At Nashik

बागमार गौरव सोहळ्यासाठी गडकरी, राज ठाकरे आज शहरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी (दि. 18) शहरात येत असून, नाशिक मर्चन्ट्स को-ऑपरेटिव्ह बॅँकेचे अध्यक्ष हुकूमचंद बागमार यांच्या अमृतमहोत्सवी गौरव सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. सातपूर येथील बॅँक मुख्यालयाच्या प्रांगणात दुपारी 2 वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सत्कार समितीचे निमंत्रक आमदार वसंत गिते यांनी दिली. बागमार यांनी सहकार, सामाजिक, आरोग्य या क्षेत्रात केलेल्या असाधारण कामगिरीचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. बॅँकेच्या नामको संचालक मंडळाने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.