आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत भाजपचे रास्ता रोको, भर रस्त्यावर गोमांस टाकल्याने नागरिक संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरात रस्त्यावर गाेमांस टाकल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने रविवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रस्त्यात ठिय्या मांडून ‘भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.
अज्ञात दुचाकीस्वाराने गोमांस टाकून पळ काढल्याचे रविवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान नागरिकांच्या लक्षात येताच गर्दी जमू लागली. भाजप पदाधिकारी जगन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अध्यक्ष गिरीश भदाणे, प्रदीप पेशकार, गणेश ठाकूर, यशवंत नेरकर, शैलेश साळुंखे, मुकेश शहाणे, शिवाजी बरके, अनिल चांदवडकर, शेखर निकुंभ, राम बडगुजर, ललिता भावसार आदींसह नागरिकांनी समाजकंटकाला ताब्यात घेईपर्यंत आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सर्वांशी चर्चा करून संशयिताला अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर अांदाेलन मागे घेण्यात अाले.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली घटना कैद : गाेमांसटाकून पळण्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते. या परिसरातील एका दुकानातील कॅमेऱ्यात हा सर्व प्रकार रेकाॅर्ड झाला असून, पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत. संशयिताला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

शिवसेना, मानवाधिकार समितीनेही केला निषेध
नगरसेवक सुधाकर बडगुजर अरविंद शेळके, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष प्रदीप आहेर, चंद्रहास जाधव, सुनील तायडे, प्रशांत शर्मा यांनी निषेध नोंदविला. ‘आवास’चे गौरव क्षत्रिय, सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ, मनीष मोरे, रोहित भाटिया, पप्पू जाधव, दीपक भोगे, अभिजित महाले यांनी कारवाईची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...