आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Shiv Sena, Mahaaghadi Before Eachother For Education Committee

शिक्षण समितीसाठी युती, महाअाघाडी अामने-सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रभाग समिती निवडणुकीतील नगरसेवकांची फाटाफूट लक्षात घेता यंदा शिक्षण समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी अपक्षांच्या अाघाडीने ताकही फुंकून घेण्याचा पवित्रा घेतला अाहे. गुरुवारी अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक चुरशीची झाली अाहे. सभापतिपदासाठी सात, तर उपसभापतिपदासाठी पाच अर्ज दाखल झाले अाहेत.
शिक्षण मंडळ सभापती उपसभापतिपदासाठी शनिवारी (दि. ४) निवडणूक हाेत असून, या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी १० ते दुपारी वाजेदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. महापाैर, स्थायी समिती सभापतिपदाच्यानिमित्ताने तयार झालेला मनसे, राष्ट्रवादी अपक्षांचा फाॅर्म्युला या निवडणुकीसाठी वापरला गेला. तत्पूर्वी उमेदवारी अर्ज काेणी दाखल करायचे, यावरून महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी बराच खल चालला. यावेळी उपमहापाैर गुरुमित बग्गा, राष्ट्रवादीच्या गटनेत्या तसेच विराेधी पक्षनेत्या कविता कर्डक, मनसे महानगरप्रमुख राहुल ढिकले, सभागृहनेता सलीम शेख, जिल्हाध्यक्ष सुदाम काेंबडे अादींसह नगरसेवक उपस्थित हाेते. महाअाघाडी असली तरी प्रत्येक पक्षाकडून स्वतंत्ररीत्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात अाले.
शिवसेना-भाजपचेलक्ष फाटाफुटीकडे : शिवसेनेकडूनहर्षा बडगुजर, तर भाजपकडून ज्याेती गांगुर्डे या दाेघांनी सभापती उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल केले अाहेत. शिवसेना भाजपचे संख्याबळ असून, मॅजिक फिगर अाहे. काँग्रेसचे नाराज दाेन सदस्य युतीकडे अाले तरी दाेन मतांची गरज भासणार अाहे. मनसेच्या रसदीवर युतीचे गणित अवलंबून असेल.

समितीवर‘चव्हाण’राज येण्याची शक्यता : महाअाघाडीतअपक्ष गटनेते संजय चव्हाण यांना सभापतिपद, तर मनसेकडून गणेश चव्हाण यांना उपसभापतिपद दिले जाण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर समितीवर ‘चव्हाण’राज येईल, असे चित्र अाहे. माळाेदे यांनी मनसेकडून अर्ज दाखल केला असला तरी त्यांची एेनवेळी माघार हाेईल, असे सांगितले जाते. पुढील वर्षी मनसेचा सभापती हाेईल, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे. दरम्यान, काँग्रेसकडून महाअाघाडीवर दबावाचा प्रयत्न होत असून, काँग्रेसचे गटनेते उत्तमराव कांबळे यांनी उपमहापाैर गुरुमित बग्गा यांना पत्र लिहून काँग्रेसला किमान या निवडणुकीत पद देण्याची मागणी केली आहे.

सभापती : संजयचव्हाण (अपक्ष), वत्सला खैरे (काँग्रेस), याेगिता अाहेर (काँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्याेती गांगुर्डे (भाजप), सुनीता निमसे (राष्ट्रवादी), मीना माळाेदे (मनसे).
उपसभापती: वत्सलाखैरे (काँग्रेस), याेगिता अाहेर (काँग्रेस), हर्षा बडगुजर (शिवसेना), ज्याेती गांगुर्डे ( भाजप), गणेश चव्हाण (मनसे).