आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Sivasena Fielding For The Municipal Corporation

प्रभाग पद्धत गृहीत धरून सेना-भाजपची रणनीती, स्वतंत्रनिवडणूक लढवण्याची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शिवसेना अाणि भाजपमध्ये अातापासूनच टक्कर सुरू झाली असून, युतीएेवजी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी दाेन्ही पक्ष करत अाहेत. त्यातही दाेन किंवा तीन वाॅर्डांचा एक प्रभाग गृहीत धरूनच सध्या निवडणुकीची माेर्चेबांधणी केली जात अाहे. दाेन्ही पक्षांच्या अंतर्गत बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना प्रभाग पद्धती गृहीत धरूनच काम करण्याचे संकेत देण्यात येत अाहेत.
पालिका निवडणूक वर्षावर येऊन ठेपली असून, त्या दृष्टीने राजकीय हालचालींना जाेर येत अाहे. यात विशेषत: शिवसेना अाणि भाजपच्या गाेटात गरमागरम वातावरण अाहे. काही महिन्यांपासून शिवसेना राज्य सरकारमधील भाजपच्या धाेरणाविरुद्ध अावाज उठवू लागल्याने दाेन्ही पक्षांत वितुष्ट निर्माण झाले अाहे. मार्चमध्ये भाजपच्या धाेरणांविराेधात शिवसेनेने महामाेर्चा काढला हाेता. स्वतंत्र मराठवाड्याच्या समर्थनार्थ बाेलणाऱ्या राज्य महिला अायाेगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी राडा घातला हाेता. या सर्व प्रकरणांमुळे शिवसेना अाणि भाजपमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला अाहे. भाजपच्या राज्यस्तरीय मेळाव्यात शिवसेनेच्या अांदाेलनांकडे दुर्लक्ष करण्याचा कानमंत्र वरिष्ठांनी दिल्याने ताे शिवसैनिकांच्या अधिकच जिव्हारी लागला अाहे. भाजप अापल्याला संपवायला उठला असून, ‘यापुढे एकट्याने निवडणूक लढण्याची तयारी करा’ असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले अाहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही नाशिकमधील बैठकीप्रसंगी युती हाेण्याचे स्पष्ट संकेत दिले अाहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी अाता कामाला सुरुवात केली अाहे.

अागामी निवडणुकीत पालिकेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी दाेन किंवा तीन वाॅर्डांचा मिळून एक प्रभाग करण्याच्या हालचाली सुरू अाहेत. पालिका निवडणुकीत तयार होणारे अशा प्रकारचे प्रभाग भाजपच्या पथ्यावर पडणारे असल्याचे अहवाल विविध शहरांतून पक्ष कार्यालयाला प्राप्त झाले अाहेत. दुसरीकडे, शिवसेनाही प्रभाग पद्धतीचीच वाट बघत असून, एका प्रभागात एक जरी चांगला सक्षम उमेदवार असल्यास अन्य उमेदवारांना बळकटी मिळेल, असा अाशावाद व्यक्त केला जात अाहे.

विविध पक्षांच्या नगरसेवकांना अाकृष्ट करण्यामागेही प्रभाग पद्धतीचे समीकरणच असल्याचे बाेलले जात अाहे. दाेन किंवा तीन उमेदवारांपैकी एक जरी माजी नगरसेवक वा सक्षम उमेदवार असेल, तर त्याच्या मतांचा फायदा अन्य उमेदवारांनाही हाेऊ शकताे, अशा विचारानेच अन्य पक्षातील नगरसेवकांवर जाळे टाकले जात अाहे.

दोन्ही पक्ष आपापल्या ‘काव्यात’
राज्यात बरोबरीचा वाटेकरी, तर केंद्रातही सत्तेत सहभागी असलेली शिवसेना भाजपशी जुळवून घेण्याच्या विचारात दिसत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ‘एकला चालो रे’ची भूमिका स्पष्ट करून टाकली आहे. दुसरीकडे, भाजप सध्या ‘शत-प्रतिशत’ची घोषणा स्पष्टपणे करत नसली तरी पालिका निवडणूक एकट्याने लढविण्याची धमक भाजपदेखील या पार्श्वभूमीवर दाखवित आहे.