आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोदापार्क : भाजपचे मनसेला पाठबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदापार्कवरून विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू असल्याने या प्रकल्पाविषयी नागरिक तर्कवितर्क करीत असतानाच सत्ताधारी गटातील भाजपने निवडणुकीतील वचननाम्याद्वारे साबरमतीच्या धर्तीवर गोदावरीचा विकास करण्याचे आश्वासन दिलेले असल्याचे सांगत या प्रकल्पासाठी पूर्णपणे सर्मथन दिल्याने मनसेला बळ मिळाले आहे.

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने गुजरातमधील साबरमती नदीप्रमाणेच गोदावरीचा विकास करण्यासाठी सव्र्हेक्षणासाठी अंदाजपत्रकामध्ये आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गेल्या अंदाजपत्रकात तशी तरतूदही करण्यात आली आहे. निवडणुकीमध्ये भाजपने वचननाम्यात यासंदर्भात आश्वासन दिलेले असल्याने या वचननाम्याच्या पूर्तीबरोबरच मनसेला पाठबळ देण्याचा उद्देशही पूर्ण होत असल्याने भाजप गोदापार्कसाठी आग्रही आहे. महासभेतदेखील गटनेते संभाजी मोरूस्कर यांच्यासह भाजपच्या सर्वच सदस्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला होता. आता विरोधक या प्रकल्पाविषयी विविध प्रश्न उपस्थित करीत असल्याने त्यास मनसेबरोबरच भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे.

सौंदर्यात भर पडणार
प्रकल्पामुळे गोदावरीच्या सौंदर्यात भरच पडणार आहे. या सर्व सुविधायुक्त प्रकल्पामुळे नाशिकमध्ये एक उत्तम पर्यटनस्थळ निर्माण होईल. आज राजकीय वतरुळात ‘जर-तर’ सुरू असले तरी प्रकल्प पूर्णत्वास जाईल, तेव्हाच त्याचे महत्त्व नाशिककरांना खर्‍या अथार्न समजेल. - सतीश कुलकर्णी, उपमहापौर

विरोधासाठी विरोध नको
महापालिकेचा एक पैसा खर्च न होता शहरासाठी एक मोठा प्रकल्प होत असल्याने सर्वांनीच त्याचे स्वागत करायला हवे. केवळ विरोधासाठी विरोध करू नये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सादरीकरण केले आहे. त्यामुळे त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. - संभाजी मोरूस्कर, गटनेता, भाजप