आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये अाता गुन्हेगार कार्यकर्ता पडताळणी माेहीम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना पायघड्या टाकण्याच्या पक्षाच्या भूमिकेमुळे प्रतिमा मलीन हाेत असल्याची जाणीव अखेर प्रदेश भाजपला झाल्याचे वृत्त असून, पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना पुढील जबाबदाऱ्या देण्याचे अादेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. भाजपची सत्ता अाल्यानंतर कार्यकर्त्यांचे माेहळच जणू पक्षाच्या पदाधिकाऱ्यांभाेवती निर्माण झाले अाहे. शहरातून चार अामदार निवडून दिल्याने त्यात सत्ता असल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही माेठ्या अाहेत. त्यात प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी, काँग्रेस मनसेचा सुपडा साफ झाल्यामुळे किंबहुना त्यांचे पदाधिकारीही सुस्त असल्यामुळे सत्ताधारी गटात सामील हाेऊन स्वत:चे भले करून घेण्याची मानसिकता दिसत अाहे. दुसरीकडे, काही अपप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा सत्ताधारी गटात दाखल झाल्यामुळे पाेलिस वा अन्य यंत्रणांकडून त्रास हाेणार नाही या हिशेबातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न अाहे.
गेल्या काही महिन्यांत शहरातील गुन्हेगारी वर्तुळात ख्यातनाम असलेल्या अनेकांनी भाजपत रुबाबात एण्ट्री करून घेतली. विशेष म्हणजे हे करण्यामागे भाजपचे काही अामदार तसेच पदाधिकारी असल्यामुळे त्याविराेधात सामान्य कार्यकर्त्यांकडून केवळ अस्वस्थता अगतिकता व्यक्त करण्यापलीकडे काहीही घडले नव्हते. मात्र, दिवसागणिक अशा प्रवेश साेहळ्यांचे वारंवार बार उडू लागल्यामुळे तसेच माध्यमाकडून भाजपच्या गुन्हेगार पुनर्वसनाबाबत टीका हाेऊ लागल्यामुळे ही बाब थेट प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली गेल्याचे वृत्त अाहे. त्यांनी अागामी निवडणुका लक्षात घेत विराेधी पक्षाला अायतेच टीकेसाठी काेलीत मिळू नये म्हणून खबरदारीची पावले उचलली अाहे. भाजपमध्ये येण्यापर्यंत ठिक परंतु अशा व्यक्तींना उमेदवारी वा महत्त्वाची पदे दिले जाणार नाही यादृष्टीने प्रत्येकाची चारित्र्य पडताळणी करण्याचे अादेश दिल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.

राष्ट्रवादीचे असेच झाले अध:पतन
राष्ट्रवादी काँग्रेस एेन भरात असताना माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याभाेवती त्यांच्या समर्थकांनी अशाच पद्धतीने तयार केलेले काेंडाळे त्यांच्याबद्दल नाराजी तयार हाेण्याचे कारण ठरले. गुन्हेगारीच्या मुद्याला हात घालून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ता मिळवल्याचा इतिहास अाहे. अाजघडीला नानाविध मुद्यांनी भाजप अाधीच अडचणीत असताना गुन्हेगारीकरणाच्या मुद्यावरून पक्षाची प्रतिमा धाेक्यात येऊ शकते, अशी जाणीव नाशिकमधील काही जुन्या-जाणत्या नेत्यांनी प्रदेशस्तरावर करून दिली अाहे. त्यामुळे अाता सबुरीचा मार्ग अवलंबला जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...