आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप इच्छुकांच्या 17 तारखेपासून मुलाखती 122 जागांसाठी सर्वाधिक 700 हून अधिक इच्छुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : केंद्र अाणि राज्यात सत्ता मिळविणाऱ्या भाजपला नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकांतही माेठ्या प्रमाणात यश प्राप्त झाल्याने नाशिक महापालिका निवडणुकीसाठीही इतर पक्षांच्या तुलनेत याच पक्षात सर्वाधिक ७००हून अधिक इच्छुक असून, त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम येत्या १७ तारखेपासून जाहीर करण्यात अाला अाहे. 
 
महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर हाेताच सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना तिकिटासाठी जाेरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली अाहे. गतवेळेच्या महापालिका निवडणुकीत प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या शिवसेना अाणि भाजपला पुरेसे उमेदवारही मिळाले नव्हते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत याच दाेन पक्षांकडे सर्वाधिक इच्छुकांची गर्दी झाली असून, त्यात प्रत्येक प्रभागात उमेदवारीसाठी स्पर्धा रंगणार असल्याचे चित्र अाहे. 
 
भाजपकडून इच्छुुकांना पक्ष कार्यालयातून सशुल्क अर्ज घेण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. यामध्ये सर्वच १२२ जागांसाठी तब्बल ७००हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले अाहेत. यात पक्षाच्या निष्ठावंत अाणि जुन्या कार्यकर्त्यांसमवेतच मनसे, राष्ट्रवादी अाणि काँग्रेसमधून नुकतेच भाजपवासी झालेल्या विद्यमान नगरसेवक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश अाहे.
 
 या इच्छुकांच्या येत्या मंगळवारी (दि. १७) पक्षाच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार अाहेत. यामध्ये पहिल्या एक ते दहा प्रभागांसाठी १७, तर दुसऱ्या दिवशी प्रभाग क्रमांक ११ ते २० अाणि तिसऱ्या दिवशी १९ जानेवारीला उर्वरित प्रभाग क्रमांक २१ ते ३० मधील मुलाखती हाेणार अाहेत. 
 
स्बळावरच निवडणुकीची शक्यता 
भाजपशिवसेनेकडे इच्छुकांची संख्या लक्षात घेत दाेघाही पक्षांच्या श्रेष्ठींना तिकीट वाटपात माेठी कसरत करावी लागणार अाहे. त्यातच वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा सुरू असली तरी नाशकातील इच्छुकांची संख्या लक्षात घेता पक्षाकडून युतीची शक्यता धूसर असून, स्वबळावरच लढण्याची शक्यता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्तविली जात अाहे.
 
 तरीही युती झालीच तर दाेन्ही पक्षांत माेठी बंडखाेरी हाेऊन युतीसमाेर माेठे अाव्हान निर्माण हाेण्याची शक्यता अाहे. या सर्व शक्यता पडताळून बघता तूर्त तरी युती हाेणार नसल्याचे निश्चित मानले जात अाहे.
 
 भाजपच्या मुलाखतीस शहराध्यक्ष तथा अामदार बाळासाहेब सानप, अामदार देवयानी फरांदे, अामदार सीमा हिरे यांच्यासह प्रा. फरांदे, लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, राेहिणी नायडू अादी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात अाले.