आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे ‘स्वच्छ भारत’, तर मनसेचे ‘स्वच्छ शाळा’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वर्षभरावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या ताेंडावर अाता सत्तासंघर्ष सुरू झाला असून, स्थानिक पातळीवर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये जागृती करण्यासाठी भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर मनसेने स्वच्छ शाळा अभियानाचा पुकारा दिला अाहे. दर शनिवारी विद्यार्थ्यांसह पालकांचे शाळा सुटल्यानंतर एक तास स्वच्छता त्यासंदर्भातील संस्कारांसाठी प्रबाेधन केले जाणार असल्याचे महापाैर अशाेक मुर्तडक यांनी सांगितले.

महापालिका निवडणूक ताेंडावर अाली असून, या पार्श्वभूमीवर अाता महत्त्वाच्या याेजना राबवून लाेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी धडपड सुरू झाली अाहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात स्वच्छतेचा प्रश्न बिकट असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे बकाल नाशिकचे दर्शन घडत अाहे.
दिवसेंदिवस वाढती लाेकसंख्या लक्षात घेता सफाई कर्मचारी वाढूनही उपयाेग हाेणार नसल्याचे चित्र अाहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला स्वत:बराेबरच घराची, परिसराची स्वच्छता कशी राहील, याबाबत प्रबाेधनाची गरज निर्माण झाली अाहे. त्या अनुषंगाने मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लाेकांनी डाेक्यावर घेतले. या अभियानातून भाजपची पत वाढल्याचे बघून मनसेने शाळापातळीवर स्वच्छता उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला अाहे. त्या अनुषगांने शिक्षण समितीला सूचना देण्यात अाल्या असून, महापालिका शाळांबराेबरच खासगी शाळांमध्ये दर शनिवारी उपक्रम राबविला जाईल.

‘स्वच्छ भारत’शी फारकत
दर शनिवारी शाळा सुटल्यानंतर एक तास अावार, शाैचालय अन्य स्वच्छताविषयक कामे करून घेतली जाणार अाहेत. विशेष म्हणजे, स्वच्छ भारत अभियानाचा या उपक्रमाशी काेणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करीत महापाैरांनी भाजपला दणकाही दिला.