आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताच्या गाेळ्यांचा काळाबाजार, शंभर-दीडशेच्या औषधांची विक्री अडीच हजारांपर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्त्रीभ्रूणहत्येविरोधी कायद्यानुसार गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीसाठी औषधविक्रेत्यांना एमडी, स्त्रीरोग, विशेषतज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनच्या तीन प्रती घ्याव्या लागतात त्यानुसार सर्व नोंदी ठेवूनच विक्री केली करावी लागते. तसा नियम घालून देण्यात अाला अाहे. मात्र, तरीदेखील अनवाॅन्टेड-७२, अायपील, एमटीपील अशा गर्भपाताच्या गाेळ्यांची अाैषधविक्रेत्यांकडून शहरात विक्री सुरू असल्याच्या तक्रारी डी. बी. स्टारकडे प्राप्त झाल्या होत्या. 
 
त्यातील तथ्य जाणून घेण्यासाठी ‘डी. बी. स्टार’ने काही भागांतील आैषध विक्रेत्यांकडे चौकशी केली असता ‘कॉन्ट्रासेप्टिव्हज् ओरल’ अर्थात गर्भधारणेची संभावना असताना, ती टाळण्यासाठी तोंडाद्वारे घेण्यात येणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचे िदसून आले. विशेष म्हणजे, किशोरवयीन मुलींकडून या गोळ्यांचा वापर वाढला आहे. 
शहरातील विविध मेडिकल स्टोअर्सवर दररोज पाचशेहून अधिक गोळ्यांची खरेदी होत असल्याची धक्कादायक माहिती डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली. अतिकाळजीपोटी तातडीच्या गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘अनवॉन्टेड ७२’, ‘आयपील’ या गोळ्यांची सर्वाधिक विक्री हाेत असल्याने जाहिरातींचा प्रभाव जाणवताे. जाहिरातींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही अाैषध घेता येतात, असा दावा केला जात असल्याने मेडिकलवर ती सहज उपलब्ध करून िदली जात आहेत. 
मिलिंद पाटील, सहायक आयुक्त, अन्न आैषध प्रशासन 
यंत्रणेने लक्ष देण्याची गरज 
केवळगर्भपातच नव्हे तर प्रिस्क्रिप्शन गरजेची असलेली अन्य काही औषधेदेखील अशाच पद्धतीने मेडिकल स्टोअर्समधून परस्पर विक्री होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. एखादा व्यक्ती तातडीची गरज म्हणून साधी गोळी घ्यायला गेला तर काही मेडिकल्समधून त्यांना प्रिस्क्रिप्शन्स नसल्याने परत पाठविले जाते. दुसरीकडे नियमांच्या बंधनाखाली येणारी औषधे मात्र अधिक दराने बिनधास्तपणे विकली जातात. याकडे संबंधित नियंत्रक यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे. 

या भागात मिळतात सहज आैषधे 
गर्भपाताच्यागाेळ्या शहरात विनाप्रिस्क्रिप्शन मिळतील का, याबाबत माहिती घेण्यासाठी शहरातील काही अाैषधविक्रेत्यांकडे विचारणा केली. मात्र, काहीशा कमिशनवर विक्रेत्याने ही अाैषधे सहजपणे उपलब्ध करून दिल्याने या काळ्या बाजाराचा गंभीर प्रश्न अधाेरेखित हाेत अाहे. डी.बी. स्टारने गोळे कॉलनी, कॉलेजरोड, शरणपूररोड, सिडको, एमजीरोड, पंचवटीतील जुने मार्केट यार्ड परिसरातील काही मेडिकलमधून ही आैषधे विनाप्रिस्क्रिप्शन खरेदी केली. 

औषधांचे अतिसेवन घातकच 
गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. अतिकाळजीपोटी अनेक गोळ्यांचा वापर टाळावा. इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्या या केवळ आपत्कालीन परिस्थितीत वापराव्यात. सततच्या गोळ्यांनी गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो. शारीरिक संबंधानंतर ७२ तासांत घ्यावयाच्या गोळ्यांनी १०० टक्के गर्भधारणा थांबतेच असे नाही. कोणत्याही औषधाचे अतिसेवन घातकच असते. 

केवळ ‘नफ्या’कडेच अधिक लक्ष 
शासनाच्या शेड्यूल ‘एच’ आणि ‘एक्स’ या नियमांना कात्री लावून काही औषधे विक्री केली जाऊ शकतात. गोळ्यांच्या जाहिरातींवरच जर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेता येऊ शकत असल्याची प्रसिद्धी होत असेल, तर मागणी करणाऱ्यांना दुकानदारही का नकार देईल, असे आैषध विक्रीकर्त्यांचे म्हणणेे आहे. तर शंभर ते दीडशे रुपये मूळ किंमत असलेल्या औषधांची किंमत सर्रास अडीच ते तीन हजारांपर्यंत लावून विक्री केली जात असल्याने या धंद्यांकडे केवळ मोठा ‘नफा’ कमविण्याचा मार्ग समजला जात आहे. 

नियमांकडेही दुर्लक्ष 
गर्भनिरोधकासाठीवापरण्यात येणारे साहित्य गोळ्यांच्या विक्रीवर बंधन नाही. परंतु, गर्भपाताच्या गोळ्यांचा ‘शेड्यूल एच’मध्ये समावेश होतो. अशा गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय वितरित केल्या जाऊ नयेत, असा नियम घालून देण्यात अाला आहे. मात्र, या नियमाकडे आैषध विक्रेत्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

..तर महिलांसाठी ठरू शकते घातक 
तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्ण किंवा इतर कुणालाही गोळ्या देऊ नयेत, असा नियम आहे. कारण अनेकदा अनैतिक गर्भपातासाठी त्याचा वापर होतो. मात्र, त्यावेळी गर्भाचा आकार, त्याची स्थिती, त्याचे ठिकाण रुग्णाची प्रकृती विचारात घेता अशी औषधे दिल्यास रुग्णाच्या प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो. काही कारणास्तव प्लेटलेट्स कमी असल्यास किंवा रक्त गोठण्याची क्रिया नीट झाल्यास महिलेची प्रकृती गंभीर हाेण्याची शक्यता असते. म्हणूनच विनातपासणी औषध विक्रेत्यांनी गर्भपाताचे कीट देऊ नये, असे अन्न अाैषध प्रशासनाच्या नियमात नमूद अाहे. 

अाैषध प्रशासनाचे औषधविक्रेत्यांसाठी नियम 
{औषध विक्रेतेसुद्धा गर्भपात कीटची विक्री करू शकतात, मात्र, अशी विक्री ही कायदेशीर व्हावी. 
{ विक्रेत्यांनी ते कीट किती कुठून आणि कसे विकत घेतले, त्याचे बिल त्यांनी कुणाला विकल्या, याची माहिती ठेवावी. 
{ कोणत्या स्त्रीरोगतज्ज्ञाने त्या लिहिल्या, त्यांच्या चिठ्ठीची झेरॉक्स प्रत जवळ जपून ठेवावी. 
{ ‘कीट’ची विक्री साठा यांची बेरीज योग्य करणे महत्त्वाचे आहे. बेकायदेशीररित्या कीट देऊ नये. 
 
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गर्भपाताच्या औषधविक्रीबाबत कठोर पावले उचलली आहेत. मात्र, शहरात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गर्भपाताची अाैषधे विक्री हाेत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाला अाहे. बाहेरील राज्यांतून छुप्या मार्गाने गर्भपाताची औषधे शहरात मागविण्याचा गोरखधंदा सुरू असून, शहरातील अाैषधविक्रेत्यांकडून शंभर-दीडशे रुपये किमतीच्या औषधांची तब्बल अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याचे धक्कादायक चित्र कायम आहे. दुसरीकडे विनाप्रिस्क्रिप्शन औषधे परस्पर दिली जात असल्याने, अशी औषधे घेतल्यानंतर निर्माण होणारा धोकादेखील कायम आहे. गर्भपाताच्या अाैषधांच्या या काळ्या बाजारावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत... 
{ शहरातील काही मेडिकल स्टोअर्समध्ये गर्भपाताच्या औषधविक्री केली जात आहे, त्याबाबत माहिती आहे का? 
- गर्भपाताच्याऔषध विक्रीसंदर्भात माहिती घेत त्याच्यावर कारवाई केली जाईल. 
{अनवाॅन्टेड-७२, अायपील, एमटीपील या गर्भपाताच्या गाेळ्यांची शहरातील अाैषध विक्रेत्यांकडून सहज िवनाप्रिस्क्रिप्शन विक्री दिली जातात त्याचे काय? 
- अनवाॅन्टेड-७२,अायपील, एमटीपील या आैषधांना प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. कारण ही आैषधे शेड्यूल ‘एच’मध्ये येत असल्याने त्यांची प्रिस्क्रिप्शनविना विक्री करता येते. 
{मात्र, स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायद्यानुसार गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीसाठी औषधविक्रेत्यांना एमडी, स्त्रीरोग, विशेषतज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनवरच आैषध विक्री करण्याचे निर्देश आहेत. मग अशी विनाप्रिस्क्रिप्शन विक्री कशी? 
- शासनाच्याशेड्यूल ‘एच’ आणि ‘एक्स’ यासाठी वेगवेगळे नियम आहेत. गर्भपातासाठीच्या आैषधांसाठी एमडी, स्त्रीरोग, विशेषतज्ज्ञांचे प्रिस्क्रिप्शन लागते. मात्र, गर्भ राहू नये, यासाठीच्या आैषधांना सूट दिलेली आहे. 
बातम्या आणखी आहेत...