आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलमध्ये कैद केल्या मित्राच्या ‘रासलीला’; ब्लॅकमेल करून उकळले लाखो रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मित्र आणि त्याच्या प्रेयसीच्या ‘रासलीलां’चे मोबाईलमध्ये चित्रीकरण करत मित्राकडून लाखो रुपये उकळणाऱ्या संशयितास आडगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संशयित मित्राच्या हॉटेलमध्येच कामाला होता. 

या प्रकरणी संजय काजळे (रा. नांदुरगाव) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे नांदुर नाका येथे हॉटेल अाहे. संशयित दीपक महादू सूर्यवंशी (रा. नांदुरगाव) हा त्यांचा मित्र या हॉटेलवर व्यवस्थापक म्हणून कामाला होता. काजळे यांचे चार-पाच वर्षांपूर्वी एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. दीपकवर विश्वास असल्याने तिला भेटण्यास जाताना ताे सोबत असायचा. त्याचा गैरफायदा घेत त्याने दोघांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. आर्थिक वाद झाल्याने त्यांनी दीपकला कामावरून काढून टाकले. चिडलेल्या दीपकने काजळे यांच्या व्हिडिओ क्लिप दाख‌त ब्लॅकमेल केले. विवाहित असल्याने काजळे यांनी संशयिताच्या धमक्यांना बळी पडून वेळोवेळी सुमारे चार ते पाच लाख रुपये दिले. मोबाईल, लॅपटॉप, एलईडी आदी चैनीच्या वस्तूही दीपकने उकळल्या. शनिवारी (दि. ८) संशयिताने आणखी दोन लाखांची मागणी केली. रक्कम देण्यास नकार दिल्याने व्हिडिओ चित्रीकरण मित्रांना कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून काजळे यांनी रविवारी पोलिसांत धाव घेतली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ निरीक्षक सुनील पुजारी यांनी गुन्हा दाखल केला. संशयितास नांदुरगावात अटक करण्यात आली. व्हिडिओ चित्रीकरण केलेला मोबाईल, संगणक जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (दि. १२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

आणखी काही प्रकार उघडकीस येणार 
संशयिताने मित्राला ब्लॅकमेल करत लाखोंची रक्कम उकळली. त्याने असे आणखी प्रकार केल्याचा अंदाज असून तेही उघडकीस येणार आहेत. तंत्रविश्लेषण शाखेकडून तपास सुरू आहे. 
- सुनील पुजारी, वरिष्ठ निरीक्षक, आडगाव 
बातम्या आणखी आहेत...