आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेवारस प्राण्यांना थंडीत उबदार पांघरूण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हुडहुडी भरणाऱ्या थंडीने एव्हाना शहराला कवेत घेण्यास सुरुवात केली अाहे. त्यामुळे सकाळी अन् सायंकाळनंतर उबदार कपडे परिधान करण्यावर भर दिला जात अाहे. पण, रस्त्यावरच्या मुक्या प्राण्यांनाही ही थंडी त्रस्थ करीत असेल असा विचार काेणी केला? कृषी गाेसेवा ट्रस्टने मात्र बेवारस गायींना रात्रीच्या वेळी उबदार कपडे गुंडाळून ऊब देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला अाहे. एरवी हिवाळ्यात रात्रीच्या वेळी थंडीने हंबरलेल्या गायी अाता या उपक्रमामुळे शांतपणे पहुडत असल्याचा सुखद अनुभव गाेशाळेत गेल्यावर येत अाहे.

गायी, बैल यांचे पालन अगदी प्रेमाने केले जाते. मात्र, गायीचे दूध देणे अाणि बैलाचे काम करणे बंद झाल्यास त्याला माेकाट साेडून दिले जाते. अशा अाजारी अवस्थेत हा मुका प्राणी अन्नासाठी भटकताे. बऱ्याचदा या भटकंतीतच त्याचा मृत्यू हाेताे. अशा अाजारी गायी, बैल, घाेडे अाणि तत्सम प्राण्यांची सुश्रूषा करण्याचे काम पंचवटी येथील कृषी गाेसेवा ट्रस्टने केले अाहे. संपूर्णत दानशूरांच्या मदतीने चालणाऱ्या या गाेशाळेत विविध उपक्रमही राबविण्यात येतात. सध्या या गाेशाळेत सुमारे ३०० प्राणी अाणि पक्षी रहिवास करत अाहेत. त्यातील बरेचसे दुर्धर अाजारांशी सामना करत अाहेत.
हिवाळ्याच्या काळात या प्राण्यांना थंडी त्रस्त करते. अशा परिस्थितीत या प्राण्यांसाठी स्वतंत्र ब्लँकेटची व्यवस्था करण्यात येते. ज्या दिवशी जास्त थंडी असेल त्या दिवशी प्राण्यांना चादरी, ब्लँकेट टाकले जाते. रात्रीच्या वेळी गोशाळेतील कर्मचारी एखाद्या लहान मुलाप्रमाणे या सर्वच प्राण्यांची अत्यंत मायेने देखभाल करत असतात. या कामात ट्रस्टच्या व्यवस्थापिका रूपाली जाेशी यांच्यासह पुरुषाेत्तम अाव्हाड, भास्कर वाघ, जितू शिंदे, सर्जेराव गाेरे, विकी माहेश्वरी, सागर कासे, उमेश नागरे अादी प्रयत्नशील असतात.

उष्णतेच्या काळात फॅनचा वापर
^प्राण्यांच्याशरीरातउष्णता अधिक असते. त्यामुळे अाम्ही गाेठ्यामध्ये फॅन लावले अाहेत. थंडीच्या काळात या प्राण्यांवर अाम्ही ब्लँकेट टाकताे. थंडीची ऊब मिळाल्यावर अंगावरील कपडे हे प्राणी झटकतनाहीत. रूपाली जाेशी, व्यवस्थापिका,कृषी गाेशाळा ट्रस्ट

बातम्या आणखी आहेत...