आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुणवत्ता तपासणीसाठी रोखली रस्त्यांची देयके, ठेकेदार-बांधकाम अधिकाऱ्यांच्या उरात धडकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात सुरू असलेल्या जवळपास साडेचारशे कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त होत असल्याचे बघून आता खुद्द आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनीच या कामांच्या गुणवत्ता नियंत्रणाच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे.
आयुक्तांनी लेखाधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे तूर्तास रस्त्यांच्या कामांची देयके मंजूर करण्याची घाई करू नये, असे आदेश दिल्याचे वृत्त आहे. रस्त्यांच्या दर्जाची आयुक्त स्वत: पाहणी करणार असून, त्यानंतर देयके मंजूर होणार असल्यामुळे आता ठेकेदारांबरोबरच बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांच्या उरात धडकी भरल्याचे वृत्त आहे.
कुंभमेळा तोंडावर आला असल्यामुळे आता शहरातील रस्त्यांच्या कामांना वेग आला आहे. अनेक कामांवर अखेरचा हात फिरविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती दिली जात आहे. कामे अंतिम टप्प्यात आल्यामुळे साहजिकच ठेकेदारांकडूनही पैशांसाठी तगादा सुरू झाला आहे. कुंभमेळ्यासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नसल्याने एकीकडे लेखा विभागाकडे जवळपास ५० ते ६० काेटींची देयके प्रलंबित असल्याचे सांगितले जाते.
तर, काही देयके बांधकाम खात्याच्या प्रक्रियेत अडकून पडली आहेत. अशातच रस्त्यांच्या कामाविषयी तक्रारी होत असल्याचे बघून डॉ. गेडाम यांनी कडक पवित्रा घेतल्याचे समजते. त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॅाट्सअॅप ग्रुपवर एक मॅसेज टाकून लेखाधिकाऱ्यांना रस्त्यांशी संबंधित कामांची देयके तूर्तास मंजूर करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. शक्य तितक्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आयुक्तांनी स्वत: करणार असल्याचे सांगून झटका दिला आहे. ज्या रस्त्यांची पाहणी शक्य होणार नाही तेथे अतिरिक्त आयुक्त तपासणी करतील असेही नमूद केले आहे.
स्पॉटवर गैरहजर अभियंत्यांना नोटिसा : रस्त्यांचीकामे सुरू असताना तेथे महापालिकेच्या बांधकामाचे पर्यवेक्षक असणे आवश्यक असते. महत्त्वाच्या वेळी कार्यकारी अभियंता वा उपअभियंत्यांची देखरेखही गरजेची असते, मात्र आयुक्तांनी काही रस्त्यांना अचानक भेटी दिल्यावर कामाच्या वेळी पालिकेचे जबाबदार अधिकारी नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या असून, मागील आठवड्यात प्रमुख अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणीही केल्याचे वृत्त आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, दुभाजकांचे कामही रोखले...
बातम्या आणखी आहेत...