आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए आणि एबी पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- उन्हाळ्याच्या सुट्या, पर्यटनासाठी बाहेरगावी गेलेले नाशिककर आणि नियोजित शस्त्रक्रियांची वाढलेली संख्या यामुळे शहरातील सर्वच रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. यात विशेषत: ए पॉझिटिव्ह आणि एबी पॉझिटिव्ह या रक्तगटांची चणचण भासत आहे.
सुट्यांच्या काळात नियोजित शस्त्रक्रियांची संख्याही मोठी असते. या शस्त्रक्रियांसाठीही मोठय़ा प्रमाणात रक्ताचा वापर होत असतो.
उन्हाळ्याचा दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता जनकल्याण रक्तपेढीने रक्तदान शिबिरांची संख्या वाढवून रक्त संकलन केल्याचे या रक्तपेढीचे प्रशासकीय अधिकारी विनय शौचे यांनी सांगितले, तर अर्पण रक्तपेढीत रक्तसाठा जरी समाधानकारक दिसत असला तरीही त्यातील बहुतांश रक्तपिशव्यांची यापूर्वीच नोंदणी झाली आहे, असे या रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल जैन यांनी सांगितले.