आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेट क्लब होणार ऑक्टोबरमध्ये खुला, पालकमंत्र्यांशी जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरवासीयांच्या विरंगुळ्यात वाढ हाेण्याबराेबरच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा मुक्काम वाढण्यासाठी गंगापूर धरणावर बाेट क्लब सुरू करण्यात अाला खरा, परंतु राज्यातील सत्तांतरानंतर या क्लबकडे दुर्लक्ष झाले. परिणामत: क्लबमधील नवीन ३६ अत्याधुनिक बनावटीच्या बाेटी धूळखात पडून अाहेत. शिवाय नाशिककरांनाही या प्रकल्पापासून वंचित रहावे लागत अाहे. हे अाेळखून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत विभागाकडून पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्याचे अादेश दिले. क्लबसाठी अावश्यक परवानग्याही तातडीने घेण्याची सूचना केली. रविवारी (दि. २८) साजऱ्या हाेणाऱ्या अांतरराष्ट्रीय पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या अादेशाला महत्त्व प्राप्त झाले अाहे.
भारतातील पहिले मातीचे धरण म्हणून गंगापूर धरण ओळखले जाते. उद्योगांसाठी तसेच घरगुती वापरसाठी असलेल्या पाण्याच्या स्रोताबरोबरच, धरणाच्या ठिकाणी मनोरंजन पार्क बोट क्लब आदी विकासकामे तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांनी सुरू करण्यात अाली. शहरापासून अवघ्या आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगापूर धरण परिसरात सुसज्ज अद्ययावत पद्धतीचे बोटिंग क्लब विकसित करण्यात आले आहे, जेणेकरून नाशिकला पर्यटकांचा मुक्काम वाढीसाठी मदत होणार आहे. शासनाकडून यासाठी जलसंपदा विभागाला पर्यटन निधी उपलब्ध करून देण्यात असून, क्लबसाठी जलसंपदा विभागाकडून एकूण ३७ बोटी खरेदी करण्यात अाल्या आहेत. यामध्ये साधारणत: वीस बोटी इंजिनवर चालणाऱ्या, तर उर्वरित बोटी या नावाड्यांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आहेत. या बाेटक्लबमुळे गंगापूर धरणाच्या निसर्गरम्य परिसरात नौकाविहार करण्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.

पालकमंत्र्यांनी दिले आदेश...
येत्याकाही महिन्यांत बोटिंग क्लबचे काम पूर्णत्वास येऊन जलसंपदा विभागाकडून राज्याच्या पर्यटन विकास महामंडळाकडे हा प्रकल्प हस्तांतरित केला जाणार आहे. त्यानंतर लगेचच पर्यटकांसाठी हा क्लब सुरू करण्याचे अादेश पालकमंत्र्यांनी दिले अाहेत.

पुढील महिनाअखेर सेवेत
गंगापूर धरणात बाेट क्लब सुरू करण्यासाठी मी तातडीने जलसंपदा विभागाची बैठक घेतली अाहे. बाेट क्लबशी संबंधित अावश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या येत्या महिना अखेरपर्यंत देण्यात येणार अाहे. शिवाय हा क्लब पर्यटन विकास महामंडळाकडेही या महिनाअखेरपर्यंत हस्तांतरित हाेईल. पुढील महिनाअखेरपर्यंत हा क्लब पर्यटकांच्या सेवेत दाखल करावा अशाही सूचना मी संबंधितांना दिल्या अाहेत. गिरीश महाजन, पालकमंत्री