आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरामध्ये शंभरावर बोगस आर्किटेक्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात तब्बल शंभरावर बोगस आर्किटेक्ट्स कार्यरत असून, त्यापैकी पंधरा जणांबाबत पुराव्यासह तक्रारी आल्या असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ आर्किटेक्ट्सच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चव्हाण म्हणाले की, या तक्रारी आर्किटेक्ट्स कौन्सिलकडे कारवाईसाठी पाठविण्यात येणार आहेत. वृत्तपत्रांमधील बातम्या, बांधकाम साइट्सवरील बोर्ड, गृहप्रकल्पांचे विक्री ब्रोशर्स, संगणकीकृत दृश्ये, अवलोकन व बांधकाम नकाशांवर या व्यक्तींचा आर्किटेक्ट म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. आर्किटेक्ट या शीर्षकासाठी आर्कि टेक्ट्स कौन्सिलचे स्पष्ट निर्देश असतानाही व्यावसायिक फायद्याकरिता त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. यातून ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, चुकीच्या पद्धतीने बांधकामे होण्याची भीती वाढली आहे. अशा लोकांकडून नुकसान झालेल्या नागरिकांनी संस्थेच्या कार्यालयात (वैराज कलादालन, कुलकर्णी उद्यानाजवळ) येथे पुराव्यांसह तक्रारी कराव्यात, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. चार जणांबाबत सबळ पुरावे असल्याने आॅगस्टपर्यंत त्यांच्यावर कौन्सिलकडून फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त करतानाच 500 रुपयांपेक्षा अधिक दंड व फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे ते म्हणाले. या वेळी संस्थेचे सचिव समीर कुलकर्णी उपस्थित होते.

धक्कादायक प्रकार
आर्किटेक्ट म्हणवणारे काही जण बांधकाम अभियंता असून, काही इंटेरियर डिझायनर आहेत. काहींनी तर कुठलेही तांत्रिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

आर्किटेक्ट शीर्षक कोणास?
बॅचलर आॅफ आर्किटेक्चर हा पाच वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेली व्यक्ती, जी आर्किटेक्ट्स कौन्सिलकडे नोंदणीकृत आहे, तीच आर्किटेक्ट हे शीर्षक वापरू शकते.