आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb The Rumor District Court, Latest News In Marathi

बॉम्बच्या अफवेने धावपळ, बॉम्ब शोध पथकाच्‍या तपासणीनंतर सुटकेचा निःश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जिल्हा न्यायालयात एका महिला वकिलाच्या दुचाकीमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने सोमवारी सायंकाळी जिल्हा न्यायालयात धावपळ उडाली. पोलिस आणि बॉम्ब शोध पथकाने या परिसराचा ताबा घेत पाहणी केल्यानंतर कापडाने पेट घेतल्याने धूर पसरल्याचे निदर्शनास आले. गाडीत बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर वकिलांसह पोलिसांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला.

जिल्हा न्यायालय आवारातील (एमएच १५ सीक्यू ९५४२) या दुचाकीमध्ये बॉम्ब असल्याची अफवा सायंकाळच्या सुमारास पसरली. संबंधित महिला वकील कामकाज आटोपून घरी जाण्यास निघाल्या होत्या. दुचाकी सुरू करताच डिकीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने इतर वकिलांमध्ये घबराट पसरली.

या ठिकाणी बंदाेबस्तावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना ही बाब कळवली. काही वेळातच पोलिस, बॉम्ब शोधपथक श्वानपथक न्यायालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास शोधमोहीम सुरू होती. अखेर दुचाकीच्या डिकीतील कापडाने पेट घेतल्याने धूर पसरल्याची खात्री झाल्यानंतर पथकासह वकिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, दुचाकीच्या डिकीत कापड पेटण्याचे कारण गुलदस्त्यातच राहिले. जिल्हा न्यायालयात दहशतवादी आणि विविध गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना आणले जाते. गाडी पेटवण्यामागे काय उद्देश असू शकतो, याचा तपास पोलिस करीत आहेत.

सखाेल चौकशी करणार
-दुचाकीच्याडिक्कीतील कापड पेटल्याने धूर निघाला होता. जिल्हा न्यायालय आवारात हा प्रकार घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. याबाबत सखाेल चौैकशी केली जाईल. हेमंतसोमवंशी, वरिष्ठ निरीक्षक, सरकारवाडा पोलिस ठाणे