आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीचा सूर्य या खंडकाव्यातून अंध बांधवांचा हुंकार प्रकटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अंध आक्रमक बोलतात, कारण त्यांना पदोपदी संघर्षाला सामोरे जावे लागते. अभिमानाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण डोळस समाज त्याला स्वीकारत नाही. त्यांचे दु:खमय जीवन जाणतो कोण? परंतु ‘रात्रीचा सूर्य’या खंडकाव्यातून त्यांचा हुंकार बाहेर आला. एका संवेदनशील व्यक्तीच्या अनुभवातून तो प्रकटला, अशा भावना रविवारी संवेदनशील व्यक्तींनी व्यक्त केल्या. निमित्त होते, ‘रात्रीचा सूर्य’ या पुस्तकाच्या प्रकाशानाचे.

रायदुर्ग (आंध्र प्रदेश) येथील कवी जगदीश केरे यांनी ‘रात्री सूर्युडू’ हे तेलुगु भाषेतील खंडकाव्य लिहिले. त्याचा अनुवाद डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी केला. त्याचे प्रकाशन रविवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झाले. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (नॅब)चे अध्यक्ष आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास पुजारी अध्यक्षस्थानी होते. कवी हेमकिरण पतकी, अक्षरलेणं प्रकाशन संस्थेचे पुरुषोत्तम कुलकर्णी, ‘नॅब’च्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार अादी मंचावर होते. सोलापूरकरांची मोठी उपस्थिती होती.
‘प्रकाश’ हेच नाव...
माजीआमदार प्रकाश यलगुलवार हे अंधांच्या उत्थानासाठी काम करतात. ते जन्मल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी विचारपूर्वक नाव ठेवले. कारण त्यांच्या नावाचा प्रकाश अंध बांधवांच्या सेवेत दिसून येतो. नॅबच्या येथील शाखेच्या काही इमारती मी पाहिल्या. त्या रिकाम्या असत्या तर त्यांच्या राजकारणातील ‘काही भाग’ मी समजू शकलो असतो. परंतु सर्व इमारतींमध्ये मिळून शंभर अंध जेवत होते, हे मी पाहिले. त्यामुळे प्रकाश यांच्या नावाचे सार्थक झाले आहे, असे गौरवोद्गार श्री. टकले यांनी काढले.
पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा, कोण काय म्हणाले...