आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी काॅलेजातून ‘स्टार्टअप’ला चालना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या ‘स्किल डेव्हलपमेंट’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्यानंतर आता कौशल्य आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांकडून नवउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालयांत इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठी सर्व मार्गदर्शन केले जाणार असल्याने महाविद्यालयांतूनच स्टार्टअप करता येणार आहे.
संदीप फाउंडेशन संचलित संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड रिसर्च सेंटर महाविद्यालयात इंडिया स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह इंटरशिप अॅण्ड इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) यांच्या सहकार्याने राज्यातील पहिले सर्टिफाइड इनक्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून शहरातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना स्टार्टअप करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनातून तयार केलेले प्रकल्प हे प्रायोगिक स्तरावरच राहता पुढे जाऊन त्यांचे पेटंट मिळवणे, लघुउद्योग सुरू करणे तसेच उद्योग सुरू करण्याच्या प्रक्रियेबाबतही या सेंटरमधून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन प्रा. अमोल पोटगंटवार यांनी केले आहे.

राज्यातील या पहिल्या सर्टिफाइड इनक्युबेशन सेंटरमुळे उद्याेग करू इच्छिणाऱ्या युवकांना सखाेल मार्गदर्शन मिळणार अाहे. उद्याेग सुरू करण्याबाबतची याेग्य माहिती मिळणार अाहे.
स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कौशल्य असतानाही तसेच नावीन्यपूर्ण संशोधन करूनही त्याचे उद्योगात रूपांतर करता येत नाही. त्यामुळे उद्योग सुरू करण्यासाठी सर्व मार्गदर्शन मिळावे यासाठी सेंटर उभारण्यात आले असून, आयईईई संदीप फाउंडेशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, मेंटॉर पी. आय. पाटील, मोहिनी पाटील, प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे, डॉ. आर. जी. तातेड, डॉ. गायत्री फडे, प्रा. अमोल पोटगंटवार यांच्यासह आयईईईचे अंधोनी लोबो, डॉ. अमितकुमार, आनंद घारपुरे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...