नाशिक - गंगापूररोड येथील के.व्ही.एन. नाईक तंत्रनिकेतन महाविद्यालयात बॉश कंपनीतर्फे अायाेजित कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे ६५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात अाली अाहे. या मुलाखत प्रक्रियेस जिल्हाभरातील १५० विद्यार्थी उपस्थित हाेते. यापैकी के.व्ही.एन. नाईक महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांसह मविप्रच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना चांगल्या नाेकरीची संधी उपलब्ध करून देण्यात अाली अाहेे.
व्ही. एन. नाईक तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे शिक्षण पूर्ण करतानाच नोकरी करण्याची संधी उपलब्ध व्हावी, विद्यार्थी अनुभवसंपन्न व्हावेत, यासाठी रोजगार मेळावा अायाेजित केला जाताे. याचअंतर्गत चाकण येथील बाॅश कंपनीच्या सहकार्याने हा कॅम्पस इंटरव्ह्यू पार पडला. यात मेकॅनिकल, आॅटोमोबाइल, प्राॅडक्शन शाखेतील जिल्हाभरातील १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डी. बी. बंगाळ, संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सरचिटणीस हेमंत धात्रक, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, तसेच पदाधिकारी सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. पी. पी. भिरूड आणि ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. व्ही. एल. सानप यांचे मार्गदर्शन लाभले. कंपनीतर्फे श्वेता बेलदरे आणि वैभव जोशी यांनी मुलाखती घेतल्या.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेच्या १५ विद्यार्थ्यांना मिळाली संधी
कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे व्ही. एन. नाईक महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या गणेश वैराळे, जयेश वैद्य, हर्षद गाडेकर, शुभंकर सदगुले, मंगेश शिंदे, गणेश सोनवणे, शुशांत मोरे, मयूर पवार, संकेत कारेकर, कार्तिक दंडावते, पंकज श्रीखंडे, निखिल कदम, निखिल पाटील, दिलीप बडगुजर, तेजस्विनी पवार या विद्यार्थ्यांना बाॅश कंपनीमध्ये ‘ट्रेनी टेक्निशियन’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली अाहे.