आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bosh Company Start Air Pollution Prevent Program Nashik

बॉश राबविणार ‘स्वच्छ हवा मोहीम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आपल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत शहरातील बॉश लिमिटेड कंपनीने ‘स्वच्छ हवा मोहीम’ राबविण्याची घोषणा सोमवारी केली. या उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 26) शहरात आठ ठिकाणी पाच हजार वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात सिटी सेंटर मॉल येथे सकाळी 10 वाजता महापालिका आयुक्त संजय खंदारे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती कंपनीच्या नाशिक प्रकल्पाचे व्यावसायिक प्रमुख थॉन्टेश एच. बी. यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख मोहन पाटील, तांत्रिक विभागाचे प्रमुख मर्बेक्स थॉमस आणि सीएसआर विभागाचे प्रमुख सुधीर येवलेकर उपस्थित होते.

सामाजिक जबाबदारीची जाणीव असलेली कंपनी म्हणून बॉश ओळखली जाते. वाहनांद्वारे होणार्‍या वायू प्रदूषणाचा आरोग्य व पर्यावरणातील विपरीत परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी कंपनीने ‘स्वच्छ हवा मोहीम’ हाती घेतली आहे. याद्वारे जनजागृती करण्यात येणार असून, यावर्षी एक दशलक्ष लोकांना या बाबीची जाणीव करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याचा अर्थ एका दिवसात पाच हजार वाहने असा होतो, असे थॉन्टेश यांनी स्पष्ट केले. या उपक्रमासाठी शहरात आठ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

थे होईल वाहनांची तपासणी (कंसात वाहन प्रकार)
एसएमबी ऑटो, त्र्यंबकरोड (पेट्रोल), भाविन व्हील्स, त्र्यंबकरोड (पेट्रोल आणि डिझेल), सिटी सेंटर मॉल (पेट्रोल आणि डिझेल), नम्रता पेट्रोलपंप, पाथर्डी (पेट्रोल), के. के. वाघ महाविद्यालय (पेट्रोल), केटीएचएम विधि महाविद्यालय (पेट्रोल आणि डिझेल), बीवायके-आरवायके महाविद्यालय (पेट्रोल), भारत टायर्स, सर्मथनगर (पेट्रोल).