आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धांगवायू रुग्णांना ‘बोटॉक्स’ची संजीवनी, राज्यातील पहिले उपचार केंद्र नाशिकमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांना इतरांवर अवलंबून राहवे लागते. अशांसाठी शासनस्तरावरही काही उपाययोजना नसल्याने रुग्णांची हेळसांड होते. त्यांच्यासाठी सोपान हॉस्पिटलमध्ये बोटॉक्स थेरपी ही उपचार पद्धती सुरू केली आहे. या आजारावर असा उपचार देणारे राज्यातील ते पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे. परावलंबी झालेल्या रुग्णांवर ना नफा ना तोटा उपचार होणार आहेत.

बोटॉक्स नाव सौंदर्यप्रसाधन असल्याचे वाटते. मात्र हा उपचार अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना पुनर्जीवन देत आहे. अंगावर झटका गेल्याने रुग्णांचे निकामी झालेले हातपायावर याद्वारे उपचार होतात. राज्यातील पहिलेच सेंटर नाशिकमध्ये सुरू करण्यात आले आहे. या उपचारा अंतर्गत सोपान हॉस्पिटलमध्ये शंभर रुग्णांवर उपचार करण्यात आले. ९५ रुग्ण पूर्ववत जीवन जगत आहेत.विषापासून बनवलेले औषध स्नायूंवर परिणाम करते. वयोमानानुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डोस दिला जातो. या औषधामुळे हातापायांत सौम्यपणा येतो. वेड्यावाकड्या हालचाली कमी होतात. नंतर फिजिओथेरपीवर नियंत्रित केले तर रुग्णांची गेलेली शक्ती काही अंशी पूर्ववत होते. परावलंबी रुग्णांचे आयुष्य बदलते. दैनंदिन कामे करण्यास मदत होते. अशा रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी न्युरो रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी, समाजामध्ये मानसन्मान मिळवून देण्यासाठी सोपान हॉस्पिटल आणि न्युरोलॉजी सेंटरचे नाशिक स्पा सिटी मुव्हमेंट डिसऑर्डर डे साजरा केला जाणार आहे.

हे आहेत लक्षणे
हातपायातत्राण नसणे, चक्कर येणे, हातापायाला मुंग्या येणे, विचित्र आवाज येणे, बोबडी वळणे, अदी सामान्य लक्षणे आहेत. लहान मेंदुवर परिणाम होतो.

देशातील तिसरे केंद्र
याथेरपीद्वारे रुग्णांचे न्यूरो रिहॅबिलिटेशन (पुनर्वसन ) केले जाते. तामिळनाडू, कोलकातानंतर देशातील हे तिसरे सेंटर आहे. शासनस्तरावर अजूनही या थेरपीचा अभाव असल्याचे निदर्शनास येते.

विषापासून औषध
आफ्रिकेतीलविषारी सापांच्या विषांपासून हे औषध तयार केले जाते. झटका आलेल्यास तीन तासांत उपचार मिळाल्यास शंभर टक्के फायदा होतो.

मायग्रेन, कंबर, मानदुखीवर उपयुक्त.
सेवाभावनेतून उपचार
अर्धांगवायूआजार गंभीर आहे. रुग्ण परावलंबी बनतो. अशा रुग्णांसाठी सोपानमध्ये सेवाभावनेतून उपचार होत आहे. थेरपी रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. संजयवराड, संचालक सोपान हॉस्पिटल आणि न्युरोलोजी सेंटर