आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सफॉर्मरला चिकटून चिमुरड्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुने नाशिकमधील बडी दर्गा येथे आई-वडिलांसमवेत दर्शनाला गेलेल्या आयान निजामुद्दीन शेख या आठवर्षीय चिमुरड्याचा ट्रान्सफॉर्मरला चिकटल्याने मृत्यू झाला. रविवारी (दि. 17) रात्री 8 वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, तासभर हा चिमुरडा ट्रान्सफॉर्मरला चिकटलेल्या अवस्थेत होता आणि नागरिक त्याला काढण्यासाठी झटत होते.

चौकमंडई येथे राहणार्‍या आणि सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले निजामुद्दीन शेख हे पत्नी व
मुलगा आयान याच्यासह रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बडी दर्गा येथे दर्शनासाठी आले होते.

दर्ग्यात गेल्यानंतर आयान उजव्या बाजूच्या भिंतीकडे गेला असता, याच भागात बाहेरील बाजूने उच्च दाबाचा विद्युत ट्रान्सफॉर्मर असून, त्यातून वीजप्रवाह भिंतीत उतरला आणि आयान अक्षरश: या ट्रान्सफॉर्मरकडे ओढला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यानंतर परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास दूरध्वनीवरून ही माहिती दिली.
उशिरापर्यंत तणाव
जुने नाशिकमध्ये अशाप्रकारचे अनेक धोकेदायक ट्रान्सफॉर्मर असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यातच ही दुर्दैवी घटना केवळ महावितरणच्या भोंगळ कारभारानेच घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. परिसरासह भद्रकालीतील महावितरणच्या कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.