आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इथे फुटले ड्रेनेज; मेळा स्थानकातील रहिवासी आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशभरातून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी येणार्‍या भाविकांना मेळा बसस्थानकावरूनच जावे लागते. याच स्थानकात घाण पसरल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानकात शाौचालये, गटारीतील सांडपाणी वाहत असल्याने रहिवासी, प्रवासी व एस. टी. कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, एस.टी.चे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

या स्थानकातून त्र्यंबकेश्वर, ओझर, नांदूरनाका, सिद्धपिंप्री या मार्गावरील किमान 100हून अधिक बसफेर्‍या रोज सुटतात. येथे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविक, प्रवासी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने असतात. आवारात खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. तसेच एसटी कर्मचार्‍यांची निवासस्थाने असून, किमान 50 कुटुंबीये येथे वास्तव्यास आहेत. निवासस्थानाच्या सांडपाण्यासाठीचा चेंबर फुटल्याने घाण स्थानक आवारात पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील प्रत्येक घरात हिवतापाचे रुग्ण आढळून येत आहेत. याबाबत एस.टी. कर्मचार्‍यांनी वारंवार निवेदनेही दिली आहेत.