आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात होणार ‘ब्रेस्ट मिल्क बँक’, आरोग्य विभागातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या बालकांना आणि काही कारणांस्तव स्तनपानापासून वंचित असलेल्या मातांसाठी जिल्ह्यात माता दूध बँक स्थापन करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून होत आहे. रुग्णालयातर्फे ही बँक सुरू करण्यासाठी शासनाकडे संबंधित प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय संस्थांकडून दुर्लक्षित योजना सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे.
मातेच्या दुधापासून वंचित बालकांना या बँकेद्वारे आईचे दूध मिळणार आहे. विविध कारणांमुळे नवजात बाळ आईच्या दुधापासून वंचित राहतात, तर काही मातांची मुले गेल्याने त्यांना स्तनपान करता येत नाही. या मिल्क बँकचा दुहेरी फायदा माता बालकांना होणार आहे. आईच्या दुधाचे महत्त्व सर्वज्ञात आहे. दुधामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतात.
बाळाच्या मानसिकतेवरही आईच्या दुधाचे दुरगामी सकारात्मक परिणाम होतात. आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते. जिल्ह्यात किती तरी नवजात बालकांचा, तसेच त्यांच्या मातांचा मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. अशा आई नसलेल्या बालकांचे किंवा बाळ नसलेल्या मातांचे काय, याचा विचारच आजपर्यंत झालेला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात माता दूध बँक निर्माण करण्याचा विचार होत आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना यावर नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्या अहवालानुसार ही सुविधाजनक बँक स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्तावदेखील पाठवण्यात आला आहे.

प्रक्रिया झालेले दूध दानकेलेले दूध हाताने अथवा पंपाच्या साहाय्याने साठवले जाते. डिग्री सेल्यिअसवर दिवसांपर्यंत, तर २० डिग्री सेल्सिअसवर १२ तासांसाठी दूध साठवून ठेवून नवजात बालकांना दिले जाणार आहे.

सुविधा बालकांसाठी लाभदायक
^बँक योजनेद्वारे अनेक बालकांचे प्राण वाचतील. मातांना स्तनपानासह प्राण वाचल्याचे देखील समाधान मिळेल. बँक सुरू करण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरीची अपेक्षा आहे. डॉ.एकनाथ माले, जिल्हाशल्यचिकित्सक

वैद्यकीय संस्थांकडून दुर्लक्ष
माता दूध बँक संकल्पना राज्यातील काही निवडक ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, ही महत्त्वाकांक्षी योजना काही ठिकाणी अद्यापही आरोग्य विभाग, तसेच वैद्यकीय संस्थाकडूनदेखील दुर्लक्षितच राहिली आहे.
दूध दान योजना अशी...
हाताने अथवा पंपाच्या साह्याने मातांचे दूध संकलित केले जाते. दात्या मातेची आरोग्य तपासणी केली जाते. यात कावीळ, बी. सी., सिकलसेल, एचआयव्ही या आजारांची तपासणी करण्यात येते. यानंतर निरोगी मातेचे दूध घेतले जाते.