आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीच्या तिघांकडे ५७ लाखांची बेहिशेबी राेकड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तीन कर्मचाऱ्यांना तब्बल ५७ लाखांची बेहिशेबी राेकड घेऊन जात असताना पेठराेड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता ही कारवाई करण्यात अाली. या प्रकरणी म्हसरूळ पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नाेंदवण्याचे काम सुरू हाेते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या देयक इतर बिलावर बळजबरी स्वाक्षऱ्या करून सुमारे ५७ लाखांची राेकड परस्पर काढून घेतल्याची निनावी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली हाेती. या माहितीनुसार पेठराेड परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पथकाने सापळा रचला. संशयित स्विफ्ट डिझायर कार (एमएच १५, पीएम २१८०) ला पेठराेड येथे थांबवण्यात अाले. कारच्या झडतीमध्ये रक्कम अाढळून अाली. त्याबाबत विचारले असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पथकाने लेखाधिकारी अरविंद जैन, स्टेनाे विजय निकम, लिपिक दिगंबर चिखले यांना ताब्यात घेत म्हसरूळ पाेलिस ठाण्यात नेले. पाेलिस निरीक्षक पी. टी. धाेंडे, मृदुला नाईक, महेश नांदुर्डीकर, दाैलत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, ही रक्कम बाजार समितीच्या एका ‘बड्या’ पदाधिकाऱ्याच्या घरी जाणार असल्याची शक्यता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने व्यक्त केली. या प्रकरणामुळे बाजार समिती संचालकांसह कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...