आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकाकडून लाच; प्राचार्यासह दाेघे ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाऊसाहेबनगर(ता. निफाड) येथील के. के. वाघ विद्याभवन अाणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य सुधीर भिलाजी जगताप उपशिक्षक बाळासाहेब देवराम माेंढे यांना बुधवारी प्राध्यापकांच्या वेतनातून दरमहा एक टक्का रक्कम लाच म्हणून घेतल्याबद्दल सापळा रचून ताब्यात घेण्यात अाले. ही शैक्षणिक संस्था अनुदानित असल्यामुळे ही कारवाई करण्यात अाल्याचेही स्पष्ट करण्यात अाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून केलेल्या या कारवाईची माहिती दिली. त्यात म्हटले अाहे की, या संस्थेतील शिक्षक प्राध्यापकांची एप्रिल २०१३ मध्ये संयुक्त बैठक घेण्यात अाली हाेती. त्यात या सर्वांनी त्यांच्या वेतनातून एक टक्का रक्कम संस्था खर्चासाठी द्यावी, असे अादेश देण्यात अाले. ही रक्कम प्राचार्य सुधीर भिलाजी जगताप हे उपशिक्षक बाळासाहेब देवराम माेंढे यांच्यामार्फत जमा करत असत. वेतन राेखले जाण्याच्या भीतीपाेटी सर्वजण ही रक्कम देत. तक्रारदारांनी जून २०१४ मध्ये ही रक्कम देण्यास विराेध दर्शविला.

त्यामुळे त्यांची वार्षिक वेतनवाढ राेखण्यात अाली. त्यानंतर प्राचार्य जगताप यांनी तक्रारदारास पाचारण करून तुम्ही जून २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या कालावधीतील तुमच्या वेतनाच्या एक टक्का, म्हणजे ६४५० रुपये शालेय दैनंदिन खर्चासाठी दिले नसल्यामुळे तुमचे मार्च २०१५ चे वेतन दिले जाणार नाही, असे सांगितले. वेतन राेखण्यात अाल्याने संंबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी सकाळी पावणेबारा वाजता के. के. वाघ विद्याभवन अाणि कनिष्ठ महाविद्यालयात सापळा रचण्यात अाला. प्राचार्य जगताप यांच्या सूचनेवरून माेंढे यांनी ६४५० रुपये स्वीकारताच त्यांना ताब्यात घेण्यात अाले. याप्रकरणी पुढील कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.