आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribing Case : Chikhalikar Illegal Property Goes Around 30 Crores

लाचखोर प्रकरण : चिखलीकरची माया 30 कोटींच्या घरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बांधकाम विभागाचे खात्याचा लाचखोर कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकरची पत्नी स्वाती यांच्या नगर येथील तीन लॉकर्समध्ये गुरुवारी 3 कोटी 27 लाख 29 हजार रुपयांची मालमत्ता सापडली आहे. यात 10 किलो सोने, तर 57 लाख रोख हाती लागले. शेवगाव येथील तीन लॉकरची झडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यात 5 किलो सोन्यासह 15 कोटीची मालमत्ता आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. चिखलीकरकडे आजवर 30 कोटींची माया आढळली आहे.


नगर येथील मर्कंटाइल बँक आणि स्टेट बँक ऑफ हैदराबादमधील लॉकर्समध्ये ही मालमत्ता आढळली. बेहिशेबी मालमत्ता जमवण्यातील सहभागावरून स्वाती यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याचे एसीबीचे अधीक्षक शशिकांत महावरकर म्हणाले. चिखलीकरच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपत आहे.
असून, त्यांना आठ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.


लातूरमध्ये पत्र धडकले, मालमत्तेचा शोध सुरू
चिखलीकर 2001 ते 2006 या काळात साडेचार वर्षे लातुरात होता. येथे त्याची मालमत्ता आहे काय याची चौकशी करण्याचे पत्र धडकताच एसीबीचे उपअधीक्षक एन.जी. अंकुशकर यांनी चिखलीकर व त्याच्या सात-आठ नातेवाइकांच्या नावे जिल्ह्यात मालमत्ता आहे काय, याची चौकशी चालवली आहे. जिल्हाधिकारी, निबंधक कार्यालय, आरटीओ, मनपाला पत्रे पाठवून दोन दिवसांत तपशील कळवण्याचे सांगण्यात आले आहे.


वडील, पत्नीच्या नावाचे नांदेडातील लॉकर सील
एसीबीने चिखलीकर यांचे येथील दोन लॉकर सील केले. यातील एक त्याचे वडील मधुकर चिखलीकर यांच्या नावे महाराष्ट्र बँकेत आहे, तर दुसरे पत्नी स्वातीच्या नावे जिल्हा बँकेच्या वामननगर शाखेत आहे. नाशिक येथील एसीबीचे पथक आल्यानंतर तपासणी केली जाईल, असे
एसीबीचे उपअधीक्षक नईम हाशमी यांनी सांगितले.