आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचितांच्या जीवनात उजळवला ज्ञानदीप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणापासून कोसो दूर राहिलेल्या वंचितांच्या जीवनात ज्ञानदीप प्रकाशमय करण्यासाठी नाशिकमधील दोन स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत मदतीचा हात दिला आहे. अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या आदिवासी पाड्यावरील मुलांसह त्र्यंबकेश्वर येथील आधाराश्रमातील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत या मुलांची "केअर' घेत त्यांना उज्ज्वल भविष्याची "झेप' घेण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

शहरातील केअर रिसर्च फाउंडेशनने सुरू केलेल्या समाजसेवा उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील वंचित बालकांना शैक्षणिक साहित्यामधील वह्या, पुस्तके, ड्रेस, स्टेशनरी, पाण्याच्या बाटल्या, खेळणी आदी साहित्याचे वाटप केले.

आधाराश्रमातील २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या मुलांच्या आयुष्यात अानंदाचे क्षण आणण्यासाठी फाउंडेशनप्रमुख अजय शुक्ला, लोकेश पटेल, सचिन देशमुख यांच्यासह इतर सदस्यांनी विविध मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तसेच त्र्यंबक, हरसूल, सुरगाणा या भागातील आदिवासी पाड्यावरील ५०० गरीब गरजू मुलांनाही मदतीचा हात देतानाच शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

तीन हजार मुलांना मदतीचा हात
सक्षमभारत घडवायचा असेल तर ग्रामीण भागातील शिक्षण आरोग्य सुविधांवर भर द्यायला हवा. त्यादृष्टीने ‘युगांत’तर्फे २००८ पासून आतापर्यंत तीन हजार मुलांना शालेय शिक्षणासाठी उपयुक्त साहित्य वाटप करण्यात अाले. तसेच, अारोग्य शिबिरे घेण्यात अाली. यापुढेही असे उपक्रम सुरू ठेवले जाणार अाहेत. -प्रा. प्राजक्ता देशमुख, युगांत फाउंडेशन
बातम्या आणखी आहेत...