आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशकालीन बाॅम्बमुळे नाशिक शहरात खळबळ, सिंहस्थच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षेत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चाेख सुरक्षा यंत्रणा तैनात असताना बुधवारी सकाळी देवळाली कॅम्पच्या भाजी मार्केटजवळ ब्रिटिशकालीन बाॅम्ब सापडला. लष्कराच्या हद्दीत बाॅम्ब सापडल्याने खळबळ उडाली अाहे.चार महिन्यांपूर्वी वालदेवी नदीवर समांतर पुलाच्या बांधकामासाठी खाेदकाम करताना ब्रिटिशकालीन बाॅम्ब आढळूून अाला हाेता.

नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या देवळाली कॅम्पच्या लेव्हिट मार्केट जवळील भाजी मार्केटच्या मागे गाजर गवतात बुधवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास भाजी विक्रेत्याला गाेलाकार दगडासारखी दिसणारी वस्तू दिसली.पाेलिसांच्या तपासणीत दगडासारखी दिसणारी वस्तू ब्रिटिशकालीन बाॅम्ब असल्याचे स्पष्ट झाले.लष्कराच्या तज्ज्ञांच्या तपासणीत बाॅम्ब निकामी असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.सापडलेला बाॅम्ब जुना असून तापसणीनंतर लष्कराकडे साेपवण्यात अाला.देशातील वाढत्या दहशतवादी कारवाया,स्वातंत्र्यदिन व कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सतर्कतेचे अादेश दिलेले असताना लष्कराच्या हद्दीत बाॅम्ब सापडल्याने खळबळ उडाली अाहे.

सतर्क भाजी विक्रेता : भाजी मार्केटजवळील स्वच्छतागृहात लघुशंकेस जाताना गवतात गाेल दगडासारखी वस्तू दिसल्याने संशय अाला,तत्काळ पाेलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली.पाेलिसांना साेबत घेऊन त्यांना बाॅम्बसदृश वस्तू दाखवली, असे सतीश शिरसाठ या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
काळाराम मंदिर परिसरात बेवारस बॅगनेे खळबळ, बॉम्बची अफवा
पंचवटी परिसरातील काळाराम मंदिर परिसरात बेवारस बॅग आढळल्याची अफवा पसरल्यानंतर शहरात नागरिकांंमध्ये बुधवारी घबराट पसरली. दरम्यान, तासभरानंतर बॅगेत बॉम्ब नसल्याचे शोध पथकाकडून सांगण्यात आले. शहरातील पंचवटी भागात दुपारच्या सुमारास बेवारस बॅग सापडल्यानंतर शहरात बॉम्बची अफवा पसरली. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शाेधपथक घटना स्थळी दाखल झाले. बॅगेची तपासणी झाल्यानंतर त्यात बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी विषेश मोहिम राबवली. रात्री उशिरापर्यंत ही मोहिम सुरू होती.
ठिकठिकाणी वाहनांची तपासणी
आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून शहरातील मुख्य चौकात वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. बुधवारी पोलिस व बॉम्ब शोधपथकाकडून शहरातील पंचवटी, जेहान सर्कल, द्वारका, तपोवन, साधुग्राम संपूर्ण परिसराची श्वानाद्वारे व बॉम्बशोध यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. सिंहस्थाची पहिली पर्वणी २९ ऑगस्टला होणार असल्यामुळे पोलिस यंत्रणाकडून सुरक्षा व्यवस्थेचे विविध उपायोजना केल्या जात आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी शहराचा शहरातील पंचवटी, जेहाण सर्कल, द्वारका, तपोवण, साधुग्राम परिसरात बाहेर गावून येणारे शंभरहून अधिक वाहनांची तपासणी श्वानाद्वारे व बॉम्बशोध यंत्रणेद्वारे करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक शांताराम अवसारे, उपनिरिक्षक एस.डी. चव्हाण, वाहतूक शाखेचे शंकर कांबळे यांच्यासह बॉम्ब शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शनिवारपासून अाखाड्यांचे ध्वजाराेहण; तयारी सुरू
त्र्यंबकेश्वर - सिंहस्थ पर्वकाळाला २४ जुलैच्या पुराेहित संघाच्या ध्वजाराेहणाने प्रारंभ झाला असला तरी शैवपंथीय अाखाड्यांच्या दृष्टीने महत्त्व असणारा ध्वजाराेहण सोहळा १५ ते २७ अाॅगस्ट या काळात हाेत अाहे. त्र्यंबकेश्वरच्या दहाही अाखाड्यांची वेगवेगळी परंपरा असून हा सोहळा २७ अाॅगस्टपर्यंत चालणार अाहे. त्यासाठी अाखाड्यांची तयारी सुरू अाहे. ध्वजारोहणाचे वेळपत्रकही आखाड्यांतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

काही आखाड्यांत दाेन ध्वज उभारण्याची परंपरा अाहे. दशनामी संन्यासी धर्मध्वजासाठी ध्वजस्तंभ उभारणी करतात. ध्वजाराेहणाप्रसंगी आखाडा परंपरेतील पुराेहित मंत्रोच्चार करतात. काही अाखाड्यांची भगवी, लाल रंगाची पताका असते. त्यावर स्वस्तिक किंवा अाखाड्याची इष्टदेवता अादी चिन्हे काढण्यात अालेली असतात. तर, उदासी आखाड्याच्या ध्वजपताकेवर हात व मारुतीचे चिन्ह असते.
ध्वजाराेेहण त्या-त्या आखाड्यांच्या प्रमुखांच्या हस्ते विधिवत पूजेने केले जाते. महामंडलेश्वर, मंडलेश्वर, श्री महंत किंवा विशेष धर्माचार्य ही पूजा, मंत्रोच्चार व अारती करतात. त्यानंतर मान्यवरांसह उपस्थितांना प्रसादाचे वाटप हाेते. महाप्रसादात वाफ दिलेले चणे, खाेबरे तर उदासीनमध्ये खिचडी असते. त्यानंतर अखंड अन्नछत्राला प्रारंभ हाेताे. ध्वज फडकत असेपर्यंत प्रवचन, कीर्तन अादी धार्मिक कार्यक्रम चालतात, अशी चालत अालेली परंपरा अाहे.
धर्म अाणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या अाखाड्यांच्या परंपरेचे प्रतिबिंब ध्वजाराेहण सोहळ्यात उमटत असते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कुंभमेळ्याला सुरुवात झाल्याचे समजले जाते. या ध्वजारोहणासाठी ५२ फुटी स्तंभ शुभ मानला जाताे व ताे तितक्या उंचीचा असणे अावश्यकही असते. यापूर्वी त्र्यंबक तालुक्यात माेठ्या प्रमाणात जंगल असल्याने अपेक्षित लाकूड मिळण्यास अडचण नव्हती. तसेच प्रत्येक आखाड्याच्या शेतजमिनीत माेठ्या प्रमाणावर वृक्षराजी हाेती. त्यातून प्रमाणित उंचीचे लाकूड उपलब्ध हाेत असे. मात्र, वृक्षताेडीमुळे गत कुंभमेळ्यापासून वनविभागाकडून निलगिरी वृक्षाचे लाकूड प्रत्येक अाखाड्याला पुरविले जाऊ लागले. या वेळीदेखील वनविभागाने त्यासाठी नियोजन केले अाहे.
सेवा जाहीर करण्याची प्रथा
धर्म अन् राष्ट्ररक्षण हे एकच मध्यवर्ती ध्येय असले तरी प्रत्येक आखाड्याच्या उपासना देवता वेगवेगळ्या अाहेत. त्याविषयी अापापली सेवा जाहीर करण्याची ध्वजाराेहणाप्रसंगी प्रथा अाहे. अाखाडे क्रमाक्रमाने इतर अाखाड्यांतील साधू-महंतांना निमंत्रण देऊन भाेजनास बाेलावतात व दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार करतात.

अाखाडानिहाय ध्वजाराेहणाचे वेळापत्रक
श्री पंच दशनाम निरंजनी आखाडा : दि. १५ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम अानंद आखाडा : दि. १५ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम जुना आखाडा :दि. १९ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम अावाहन अाखाडा :दि. १९ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम अग्नी अाखाडा :दि. १९ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम महानिर्वाणी अाखाडा :दि. २१ अाॅगस्ट २०१५
श्री पंच दशनाम अटल अाखाडा :दि. २३ अाॅगस्ट २०१५
श्री पंच बडा उदासीन अाखाडा :दि. २६ अाॅगस्ट २०१५
श्री पंच नया उदासीन अाखाडा :दि. २४ अाॅगस्ट २०१५
श्री पंच निर्मल अाखाडा :दि. २७ अाॅगस्ट २०१५

क्षत्रियांनी सांभाळावा धर्मध्वज
परकीय आक्रमणांमुळे जर्जर झालेल्या क्षत्रिय राजांचा ध्वज आखाड्यांनी हातात शस्त्र घेऊन संरक्षित केला. त्या ध्वजाची स्थापना प्रत्येक कुंभमेळ्यात सर्व आखाडे करतात व त्याचे पूजन करतात. ध्वज उभारल्यावर आजही आखाडे आवाहन करतात की, कुणी राजा या धर्मध्वजाचे संरक्षण करण्यास समर्थ असेल त्याने हा धर्मध्वज सांभाळावा.

असा ध्वज, असे ध्वजाराेहण...

ध्वजदंडाची उंची ५२ हस्त (हात) असते.
कारण आखाड्यात एकूण ५२ मढ्या (मठ) आहेत.
ध्वज लांबीचे माप हे अंगुलाच्या परिमाणात असून, प्रचलित परिमाणात ते २९ फूट इतके असून, त्याची उंची दहा फूट आहे. ध्वजपूजन आणि आरोहण हे आखाड्याच्या चारही मढींच्या श्री महंतांच्या हस्ते होत असते.

ध्वजारोहणानंतरच आखाड्याच्या कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याचे मानले जाते. आखाड्यांमधील ध्वजारोहणाचा विधी हा त्या-त्या आखाड्याच्या पुरोहितांकडे परंपरेने करण्याचा रिवाज आहे. त्या प्रयोगात विशिष्ट मंत्राेच्चार करून सर्व प्रयोग आखाड्याच्या श्री महंतांच्या अनुमतीने पुरोहित अतिशय काळजीपूर्वक करतात. या साेहळ्याला हजाराे साधू उपस्थिती लावतात.