आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांनी नोव्हेंबर २०१४ रोजी तसा आदेश दिला आहे.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिकेच्या क्षेत्रात वृक्षतोडीची तहसीलदारांकडून परवानगी

मनोहर घोणे
नाशिक - महाराष्ट्रशासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या ‘महाबीज’च्या कार्यालय आवारात बियाण्यांसाठी गुदाम तयार करण्यात येत आहे. या कामाला अडथळा ठरणाऱ्या सुमारे १० वर्षे जुन्या असलेल्या उंबर निलगिरीच्या वृक्षांची सर्रास कत्तल करण्यात आली. विशेष म्हणजे, महानगर क्षेत्रातील ही वृक्षतोड करण्यासाठी परवानगी देण्याचा अधिकार नसतानाही
सातपूर - त्र्यंबकरोडलगतच्या प्‍लॉट नंबर ५५ वर महाबीज या बियाणे तयार करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. कंपनीचे मुख्यालय अकोला येथे असल्याने विभागातील शेतकऱ्यांना बियाणे पुरविण्याचे काम येथून केले जाते. कंपनीच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेवर सध्या गुदाम बांधण्याचे काम सुरू आहे. नाशिकमधील एका कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला. परंतु, या कंपनीने ही वृक्षतोड केली आहे.
ठेकेदारावर कारवाई करावी
वृक्षतोडीबाबतमहापालिकेची परवानगी आहे, याची शहानिशा करण्याचे काम ठेकेदाराचे असून, त्यांनी यात हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी. -प्रवीणनिगळ, वृक्षप्रेमी

पालिकेलाच अधिकार
वृक्षतोडीचीपरवानगी देण्याचा अधिकार महापालिकेलाच आहे. तहसीलला नाही. गणेशराठोड, तहसीलदार,नाशिक

महाबीजला नोटीस देणार
महाबीजनेवृक्षतोडीबाबत पत्रव्यवहार केलेला नाही. या प्रकरणी महाबीजला नोटीस देणार असून, त्यांचे उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. - महेंद्रकुमारपगारे, विभागीयअधिकारी