आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी फुटली, पाण्यासाठी वणवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- सिन्नरफाटा येथे टेलिफोनची केबल चोरण्याच्या प्रयत्नात जलवाहिनी फुटल्याने सुमारे ५० हजार लिटर पाण्याचा अपव्यय झाला. त्यामुळे सिन्नरफाटा परिसरातील रहिवाशांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी धावाधाव करावी लागली. दोन महिन्यांत दुसऱ्यांदा घडलेल्या प्रकारामुळे महिलावर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नरफाटा येथील जुन्या व्यायामशाळेसमोर रेल्वे पादचारी पूल ते मारुती मंदिरापर्यंत रस्ता रुंदीकरण बाजूच्या नाल्याचे काम सुरू आहे. नाल्यासाठीच्या खोदकामामुळे मुक्तिधाम जलकुंभाची १२ इंचाची जलवाहिनी बीएसएनएलची केबल उघडी पडली आहे. रविवारी रात्री अज्ञात लोकांनी केबल चोरताना या जलवाहिनीचाच तुकडा पडला. यामुळे जलवाहिनी सोमवारी पहाटे वाजेच्या सुमारास फुटल्याने सकाळी वाजेपर्यंत ५० हजारपेक्षा अधिक लिटर पाणी वाया गेले. सकाळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे सिन्नरफाटा परिसरात पाहणी करत असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी कळविल्याने पाणीपुरवठा विभागाने पाणी बंद केले. तोपर्यंत सिन्नरफाटा परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी नळांना पाणी आल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले. पाण्यासाठी त्यांनी वणवण करावी लागली.
दुसऱ्यांदा फुटली
जलवाहिनीदुरुस्ती दुपारी सुरू झाली असली तरी मंगळवारी पाणी येण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन जलवाहिनीच्या चाचणीनंतर पाणी साेडले जाईल, असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाणी नसल्याने गैरसोय
पाणी आल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भरउन्हात वणवण भटकावे लागले. पाणी येणार नसल्याची सूचना महापालिकेकडून मिळाली असती तर साठा करून ठेवता आला असता.
- मीना शिंदे, रहिवासी