आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशासह परदेशातही ‘बीआरटीएस’चा प्रयोग लाभदायी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- देशासह परदेशातील अनेक प्रगत शहरांमध्ये वेगवेगळ्या उपाययोजनांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांसाठी साेयीची अाणि संबंधित यंत्रणेसाठी फायदेशीर करण्यात अाली अाहे.
देशातील काही शहरांची विशिष्ट रचना अाणि तेथील रस्त्यांची अवस्था यामुळे बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिम (बीअारटीएस) अव्यवहार्य अाणि वादग्रस्त ठरलेली असली, तरी ती याेग्य रीतीने राबवल्याचीही उदाहरणे अाहेत. तसेच, काही शहरांमध्ये खासगी बसेसचाही पर्याय अवलंबण्यात अाला अाहे. अापल्या जवळच्याच मुंबईतील बेस्टच्या सेवेचे वर्णन तर ‘उत्तम’ या शब्दातच करावे लागेल. उत्तम व्यवस्थापन, चांगले रस्ते अाणि अारामदायक बस यामुळे अनेक शहरांमध्ये सार्वजनिक बससेवा ठरली अाहे किफायतशीर
ब्राझील ठरला जगातील अग्रणी देश
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक दर्जा देणारा ब्राझील हा जगातील पहिला देश आहे. क्युरिटिबा शहरात १९७४ मध्येच ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क’ सुरू झाले. त्या व्यवस्थेने प्रभावित होऊन ब्राझीलमधील काही शहरांसह अन्य देशांमध्येही ती सुरू झाली. कोलंबियात २००० मध्ये ही व्यवस्था कार्यान्वित झाली. एक काेटी ७० लाख प्रवासी एकट्या लॅटिन अमेरिकेत आहेत. ब्राझीलमधील ३३ शहरांमध्ये ही व्यवस्था कार्यान्वित आहे.
बंगळुरूत दहा लाख प्रवाशांची वाहतूक
कर्नाटक राज्य शासन, बंगळुरू डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आणि बृहत् बंगळुरू महानगरपालिका यांनी ‘बीअारटीएस’ सुरू केली आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अाहे. शहरात २८२ किलोमीटर लांबीच्या अाधुनिक १४ रस्त्यांचे जाळे तयार करण्यात अाले अाहे. १२०० ते १४०० बसेसच्या माध्यमातून दरराेज अाठ ते दहा लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. आधुनिक रस्त्यांचे जाळे आणि चांगल्या दर्जाची सेवा यामुळे खरेखुरे मेट्रोपोलिटन शहर म्हणून बंगळुरूची ओळख निर्माण झाली अाहे.

अहमदाबादेत बीअारटीएस यशस्वी
सुमारे ५५ लाख लाेकसंख्येच्या अहमदाबादेत महानगरपालिका आणि गुजरात राज्य सरकारने इंटिग्रेटेड पब्लिक ट्रान्सिट व्यवस्था सुधारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत ‘बीआरटीएस’ सुरू केली आहे. भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता ‘बीआरटीएस’ व्यवस्थेचे जाळेही वाढविण्यात येत असून, त्यासाठी शहराच्या चहुबाजूंनी रस्त्यांची व्यवस्थाही करण्यात अाली अाहे. याच बसव्यवस्थेमुळे सार्वजनिक वाहतूक तेथे बळकट झाली अाहे.