आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी बीआरटीएसचा ‘स्मार्ट’ पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सुटसुटीत आणि प्रगत असणार्‍या शहरांसाठी वाहतूक व्यवस्था उत्तम असणे गरजेचे असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असेल तर आपसूकच शहरातील रस्त्यांवरची वाहनांची गर्दी कमी होते. परिणामत: प्रदूषणाचीही पातळी घटेल. अनेक प्रगत देशांमध्ये सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने शहरातील वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेला अधिक बळकटी देण्याचे नियोजन केले आहे. ज्या शहरातील वाहतूक व्यवस्था सर्वाधिक बळकट असेल, त्यांचा समावेश ‘स्मार्ट सिटी’मध्ये होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अजून भरपूर वाव असून, त्यासाठी महापालिका, राज्य परिवहन महामंडळातील अधिकार्‍यांची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. सध्याच्या शहर बसेसची अवस्था बघता यापुढील काळात ‘बीआरटीएस’ (बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिम)चाच पर्याय ‘स्मार्ट’ ठरणार असल्याचे लक्षात येते.

जगातील बहुतांश प्रगत शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकासाच्यादृष्टीने कणा मानली जाते. दुर्दैवाने नाशिक शहरात याच व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गत दीड दशकात शहरातील प्रवासी संख्येत तब्बल पाच लाखांनी वाढ झाली. मात्र, भार उचलणार्‍या बसेस तेवढ्याच आहेत. आजघडीला २२५ बसेसमधून दररोज ६० हजार विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करतात.

- शहरातील ५१२ मार्गांवर बसेसच्या नियमित फेर्‍या
- दररोज लाख ८५ हजार प्रवाशांची वाहतूक
- ६५ हजार विद्यार्थ्यांची वाहतूक
- महिलांसाठी स्वतंत्र बसेस
- दरराेज निमाणी बसस्थानकातून २२५ बसेसद्वारे वाहतूक सेवा
- पहाटे वाजेपासून ते रात्री १२.३० वाजेपर्यंत बससेवा
- ३६०० फेर्‍यांद्वारे ५३ हजार ५०० किलाेमीटर अंतरावर बसेस धावतात
- ५१० मार्गांवर बसेस धावतात

सध्या देण्यात येणार्‍या सुविधा हे होणे गरजेचे
- शहर बससाठी स्वतंत्र संकेतस्थळ असावे.
- महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहर बससाठी तरतूद असावी.
- केंद्र राज्य सरकारकडून आणखी ३०० बसेस उपलब्ध व्हाव्यात.
- अंतर्गत रस्त्यांवर नववसाहतींपर्यंत बसेस पाेहोचाव्यात.
- अधिक आरामदायी बसेस असाव्यात.
- गर्दीच्या उत्पन्नाच्या प्रमुख मार्गांवर डबल डेकर बस सुरू कराव्यात.
- सद्यस्थितीत इंधनखर्च, देखभाल-दुरुस्तीचा खर्च अधिक हाेत असल्याने महामंडळाने १५ ते २० टन वजन पेलणार्‍या इंजिन क्षमता असणार्‍या बसएेवजी ते टन वजन पेलणार्‍या बसेस उपलब्ध करून द्याव्यात.
- सीएनजी बसेसच्या पर्यायाचा वापर करावा.
- प्रवाशांना शिस्त लावण्यासाठी व्यापक जनजागृती करावी.

हे प्रयत्न सुरू
- पंचवटीप्रमाणे नाशिकरोड आगार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.
- सिडको आणि सातपूर या परिसरासाठी सातपूरमध्ये स्वतंत्र आगार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- महिलांसाठी असलेल्या बसेसची संख्या आगामी काळात वाढविण्यात येणार आहे.
- सर्वच शहर बस थांबे अत्याधुनिक करण्यात येणार आहेत.
- सर्वच बसथांब्यांवर डिजिटल वेळापत्रक लावण्यात येणार आहे.
- मेळा बसस्थानकातून सर्वच सिटी बस सुटण्याची व्यवस्था होणार आहे.