आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीएसएनएल कर्मचार्‍यांचे आजपासून आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: दुजाभाव होत असल्याने बीएसएनएल कर्मचार्‍यांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने उद्यापासून आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. बुधवारी हे कर्मचारी सकाळी दहा ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मायको सर्कल परिसरातील संचार भवनसमोर धरणे धरतील तर 13 जूनपासून बेमूदत संपावर जाण्याचा निर्धारही करण्यात आला
बीएसएनलमध्ये समाविष्ट होण्यास नकार देणार्‍या आयटीएस अधिकार्‍यांना वेगवेगळ्या प्रकारचे 15 नवीन भत्ते देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचवेळी, बीएसएनएलमध्ये समाविष्ट होऊन प्रामाणिकपणे अहोरात्र झटणार्‍या लाखो कर्मचारी व अधिकार्‍यांना मात्र भत्ते नाकारले आहेत, दिले जाणारे भत्तेही आर्थिक अडचण दाखवून बंद करण्यात आले आहेत. हा दुजाभाव अनाकलनीय व अन्यायकारक असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.