आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल सेवांचा काॅल अद्याप ‘प्रतीक्षेतच’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - माेबाइल क्रांती झाल्यानंतर सर्वसामान्यांपासून तर सधनांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात माेबाइलने अविभाज्य स्थान मिळवले अाहे. खासगी कंपन्यांमधील स्पर्धेमुळे माेबाइल काॅलिंग स्वस्त हाेत असल्यामुळेही वापर वाढला अाहे. एकीकडे खासगी कंपन्यांमध्ये ग्राहक पळवापळवीसाठी चढाअाेढी हाेत असताना, विशिष्ट चाकाेरी साेडून काम करण्यासाठी बीएसएनएल तयारच नसल्याचे िचत्र अाहे. त्यामुळेच की काय, नेटवर्क जाम, काॅल ड्राॅप यांसारख्या समस्यांवर बीएसएनएलला उताराच सापडलेला नाही. अगदी बीएसएनएलच्याही काही कार्यालयांत नेटवर्क मिळत नसल्याचे अनेक कर्मचारी खासगीत तक्रारी करतात. खासगीच्या स्पर्धेत सरकारी सेवा गतिमान हाेत नसल्यामुळे ग्राहकही पारंपरिक दूरसंचार सेवेला रामराम करून नवनवीन कंपन्यांची सेवा घेण्यासाठी अाकृष्ट हाेत अाहेत.

ग्राहकतक्रार निवारण नावापुरतेच
ग्राहकांच्यातक्रारींचे निवारण करण्यासाठी बीएसएनएलने स्वतंत्र केंद्र सुरू केले अाहे. मात्र, येथील कर्मचाऱ्यांकडून तक्रारींची दखल घेतली जात नाही अाणि घेतलीच तर तक्रारीचे निवारण करण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करत असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत स्पष्ट झाले अाहे. तक्रार करण्यासाठी दूरध्वनी केला की, तक्रार विभागाचा दूरध्वनी कर्मचाऱ्यांकडून वेळेत उचलला जात नाही. उचलला तरी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यातून कधी तक्रारीची दखल घेतली तर फार तर चार ते पाच दिवस सेवा सुरळीत चालते. मात्र, त्यानंतर पुन्हा फाेन, इंटरनेट बंद पडत असल्याच्या बहुसंख्य तक्रारींचा सार अाहे. अलीकडे सगळे व्यवहार, देवाणघेवाण इंटरनेट, दूरध्वनीच्या माध्यमातून होत आहे. असे असताना बीएसएनएल मात्र ग्राहकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून ग्राहकांना अन्य खासगी सेवांकडे वळवण्यात भाग पाडत अाहे.

- वाणी यांनी जानेवारीत ब्राॅडबँड कनेक्शनसाठी अर्ज केला. त्यांना २३९१६०७१ हा नंबर देण्यात अाला. मात्र, महिन्यानंतरही त्यांना वायफाय माेडेम मिळू शकलेले नाही. एन. बी. पाटाेळे, सहायकप्रबंधक

कर्मचाऱ्यांचेच फाेन ‘अाउट अाॅफ रेंज’
खासगीकंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी बीएसएनएलनेदेखील भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध करून दिली असली, तरी अनेकांना घरामध्ये रेंज मिळत नसल्याने घराबाहेर येऊन संवाद साधावा लागतो. हे कमी की काय म्हणून शहरातील एन. डी. पटेल रस्त्यावरील निगमच्या कार्यालयाच्या आवारात असलेल्या मोबाइल गॅलरीच्या वरच्या भागात टॉवर असूनही बऱ्याचदा गॅलरीच्या बाहेर येऊन संवादाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, असे काही कर्मचाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर सांिगतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही अवस्था आहे म्हटल्यावर ग्राहकांना किती त्रास सहन करावा लागत असेल, याची प्रचिती अापल्याला नक्कीच येईल.

‘ट्राय’च्यानिर्देशालाही हरताळ
दूरसंचार कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या टेलिकाॅम रेग्युलेटरी अॅथॉरेटी अर्थातच ट्राय’ने नाशिकमध्ये ग्राहकांच्या तक्रारी एेकून घेण्यासाठी खासगी कंपन्यांसह बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चार महिन्यांपूर्वी ग्राहक मेळावा घेतला हाेता. या मेळाव्यात ग्राहकांनी विस्कळीत सेवा, कर्मचाऱ्यांकडून अडवणूक उडवाउडवीची उत्तरे, चुकीचे बिले येतात. मुदतीत कनेक्शन मिळण्यासारख्या तक्रारी मांडल्या हाेत्या. त्यामुळे ‘ट्राय’च्या अधिकाऱ्यांना बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तक्रारींचे निवारण अाणि सेवा सुरळीत देण्याच्या सूचना केल्या हाेत्या. मात्र, अद्यापही परिस्थिती ‘जसै थे’च असल्याचे समाेर अाले अाहे.

लाखाेरुपये खर्चूनही काॅल ड्राॅपिंग
युजर्सला विनाअडथळा नेटवर्क मिळावे म्हणून बीएसएनएलतर्फे शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त २५ टाॅवर्स लावण्यात अाले हाेते. यासाठी लाखाे रुपये खर्च करण्यात अाले. मात्र, तरीही नेटवर्कच मिळत नसल्याने काॅल ड्राॅप्सचे प्रमाण वाढले अाहे. या काॅल ड्राॅप्सच्या समस्येमुळे ग्राहकांना माेठ्या प्रमाणावर अार्थिक भुर्दंडदेखील साेसावा लागत अाहे.

- ०४ लाख माेबाइलधारक
- ३८ हजार ब्राॅडबँडधारक
- १.१० लाख लँडलाइनधारक
- १४० शहरात टाॅवर्स

अधिकाऱ्याचा क्रमांकच असताे ‘अस्तित्वहीन’
बीएसएनएलचे नेटवर्क तपासण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने थेट मायकाे सर्कल येथील दूरसंचार निगमचे कार्यालय गाठले. कार्यालयाच्या अावारात असणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमधून सहायक प्रबंधक पाटाेळे यांनाच थेट तीन वेळा फाेन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा नंबर अस्तित्वात नसल्याचा संदेश एेकायला मिळत हाेता.

तब्बल पाच महिन्यांपासून ब्राॅडबँडची करताेय प्रतीक्षाच
एकीकडे बीएसएनएलकडून ग्राहक दुरावत असताना मात्र ज्यांना खरी सेवेची गरज अाहे, त्यांना अर्ज अाणि पाठपुरावा करूनही बीएसएनएलची सेवा मिळत नसल्याची बाब समाेर अाली अाहे. कामटवाडा येथील सिद्धटेकनगरमधील प्रकाश वाणी यांनी जानेवारी महिन्यात ब्राॅडबँड कनेक्शनसाठी बीएसएनएलकडे अर्ज केला हाेता. त्यानंतर एप्रिलला अावश्यक असणारा २३९१६०७१ हा नंबर देण्यात अाला. मात्र, अद्यापही वाणी यांना वायफाय माेडेम मिळू शकलेले नाही. यासंदर्भात लेखी तक्रारदेखील दाखल करण्यात अाली अाहे. मात्र, केबल नसल्याच्या नावाखाली बीएसएनएल कर्मचारी अद्यापदेखील उडवाउडवीचेच उत्तरे देत अाहेत.

राज्यातील पहिली वायफाय सेवाही विरली हवेतच
बीएसएनएलने राज्यातील पहिली वायफाय सेवा नाशिकमध्ये सुरू केली असून, या माध्यमातून पहिली पंधरा ते तीस मिनिटे ग्राहकांना वायफाय सेवा मोफत मिळणार असल्याचे बीएसएनएलने स्पष्ट केले. असे असले तरी माेबाइलला पुरेसे नेटवर्कच मिळत नसल्याने वायफाय सेवेपासून वंचित राहावे लागत अाहे. रामकुंड, साधुग्राम, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात, पंचवटीमध्ये ही सुरू करण्यात अाली अाहे. ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने या भागात प्रत्यक्ष जाऊन वायफाय सुविधा वापरण्याचा प्रयत्न केला. यावेळी माेबाइलला नेटवर्कच मिळत नसल्याने प्रतिनिधीला वायफाय अॅक्सेसच मिळाले नाही.

नेटवर्कची समस्या नेहमीचीच
^बीएसएनएल ग्राहकांना काॅल ड्राॅप, नाॅट रिचेबल वा अन्य समस्या नित्याच्याच झाल्या अाहेत. वारंवार तक्रारी करूनदेखील त्यावर कंपनीकडून कुठल्याही प्रकारची उपाययाेजना केली जात नसल्याने ग्राहक हैराण अाहेत. -दीपक शिरसाठ

खासगी कंपन्यांकडे वाढताेय कल
^मीबीएसएनएलचा कृषी प्लॅन वापरताे. मात्र, कित्येक महिन्यांपासून वारंवार काॅल ड्राॅपिंग वा नेटवर्क नसल्याची समस्या सतावत अाहे. विशेष म्हणजे, शहरातील बहुतांश भागात जेथे खासगी कंपन्यांची सेवा मिळते तेथे बीएसएनएलचे फारसे नेटवर्क मिळतच नाही. याबाबत कंपनीच्या कार्यालयात तक्रारी करून दखल घेतली जात नसल्यामुळे अन्य ग्राहकांप्रमाणे माझाही कल खासगी कंपनीकडे वळला अाहे. सतीशबाेराडे, ग्राहक
खासगी माेबाइल कंपन्यांच्या स्पर्धेमुळे अाउट अाॅफ रेंज हाेण्यापर्यंत भारतीय दूरसंचार निगम अर्थातच बीएसएनएलवर वेळ अाली असतानाही त्यातून धडे घेण्यासाठी फारसे पावले उचलली जात नसल्याचे चित्र अाहे. म्हणूनच की काय स्पर्धा करून ग्राहक मिळवण्याचे तर साेडाच, मात्र दरवाज्यात अायतेच येणाऱ्या ग्राहकांनाही माेफत मनस्तापाची सेवा दिली जात असल्याच्या तक्रारी ‘डी. बी. स्टार’कडे अाल्या अाहेत. जास्तीत जास्त माेफत डाटा देण्याचे धाेरण खासगी कंपन्यांकडून राबवले जात असताना त्यांच्या नेटवर्कबाबत फारशा तक्रारी नसताना सरकारी सेवा म्हणून ग्राहक बीएसएनएलकडे येत अाहेत. मात्र, या ग्राहकांना प्रतीक्षेत ठेवण्यातच धन्यता मानली जात अाहे. ‘डी. बी. स्टार’चा हा त्यावर प्रकाशझाेत...
{स्पर्धा करून ग्राहक मिळवणे दूरच, पण स्वत:हून अालेल्या ग्राहकांकडेही दुर्लक्षच
{खुद्द बीएसएनएल कार्यालय परिसरातच नेटवर्क नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी
{कनेक्शनसाठी केबल नसल्याचे कारण देत ग्राहकांकडे कंपनीकडून कानाडाेळा
{बीएसएनएलला खासगी कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत असतानाच ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे
अपरिहार्य ठरत नाही का?
बराेबरअाहे. नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्यामुळे अाम्ही शहरात अतिरिक्त टाॅवरदेखील बसविले अाहेत.
{असेअसतानादेखील माेबाइलधारकांसह बीएसएनएल कर्मचाऱ्यांच्या माेबाइललादेखील नेटवर्क नसल्याचे दिसून येते.
अाम्हीजास्तीत जास्त ग्राहकांना विनाखंडित नेटवर्क देण्यासाठी प्रयत्न करत अाहाेत.

{बहुतांश ग्राहकांनी ब्राॅडबँड कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज दिले. मात्र, केबल नसल्याने कनेक्शन देऊ शकत नसल्याचे उत्तर मिळत अाहे. त्याचे काय?
ब्राॅडबँडकनेक्शन देण्यासंदर्भात काय अडचणी येत अाहेत, याची माहिती घेताे. अशा ग्राहकांनी अाता थेट माझ्याशी संपर्क साधावा.