आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीएसएनएल’चा टोल फ्री व तक्रार विंडोचे ‘बंद आंदोलन’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’ ही दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी सेवा पुरवणारी निमशासकीय कंपनी असून, देशातील 10 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देणार्‍या ‘बीएसएनएल’च्या टोल फ्री क्रमांकाने दोन महिन्यांहून अधिक काळापासून ‘कामबंद आंदोलन’ पुकारले आहे. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती सांगता येत नाही, अशी स्थिती आहे.

याबाबत ‘बीएसएनएल’ अधिकार्‍यांना खंत ना खेद अशी परिस्थिती असून, अजून किती काळ तो क्रमांक बंद राहणार, याबाबतही कोणतीच माहिती वरिष्ठांनाही सांगता आली नाही.

सर्व प्रकारच्या दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी सेवा देणारी ‘बीएसएनएल’चा टोल फ्री क्रमांकच ठप्प झाले असतील तर नागरिकांनी त्यांच्या तक्रारींबाबत संपर्क साधण्यासाठी कोणताही क्रमांक कार्यान्वित नसल्याचा प्रत्यय येत आहे.
म्हणे ‘बेस्ट मेन्टेन डिस्ट्रिक्ट’

संकेतस्थळावरील महाराष्ट्राची ‘विंडो’ बंद

हे आहेत ठप्प पडलेले क्रमांक
लँडलाइन ग्राहकांसाठी - 1500, 1800 3451500
मोबाइल ग्राहकांसाठी - 1503, 1800 1801508
ब्रॉडबँड ग्राहक - 1800 424 1600

दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर तक्रार होत नसेल तर निदान ‘बीएसएनएल’च्या वेबसाइटवरून तक्रार करावी, असा प्रयत्न करणार्‍यांना तिथेदेखील अपयश येते. कारण<अ1्रं ’>666. ु2ल्ल’.ू.्रल्ल या संकेतस्थळावरील कस्टमर केअर या पर्यायातील कम्प्लेन्ट बुकिंग आणि त्यातील जीएसएम / सीडीएमएचे महाराष्ट्र सर्कल बंद असल्याचा अनुभव येत असल्याने तिथेदेखील ग्राहकांना तक्रार करता येत नाही. तर त्याच ठिकाणी दुसरीकडे अन्य राज्यांमधील ‘बीएसएनएल’ची ही सुविधा सुरू असल्याचाही प्रत्यय येतो.

नाइलाजास्तव ‘क्विक पे’चा पर्याय
www.bsnl.co.in साइटवरील ग्राहकसेवा केंद्राच्या खिडकीतील फक्त महाराष्ट्राची तक्रार स्वीकृती ठप्प आहे. तसेच ऑनलाइन बिल भरणार्‍यांना यापूर्वी भरलेल्या बिलांची माहितीही त्यावर काही महिन्यांपासून उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, त्यात अकाउंट अद्ययावत असतानाही प्रत्येक वेळी ते नोंद करण्याची मागणी होते. त्यामुळे नाइलाजास्तव ‘क्विक पे’ पर्याय निवडावा लागतो.

स्थानिक चौकशी क्रमांकाची सेवाही ठप्प
चौकशीचा 2595766 हा क्रमांक लावल्यास ‘कस्टमर यू आर कॉलिंग, करंटली नॉट रिचेबल’ असे उत्तर मिळत असल्याने ‘बीएसएनएल’च्या समस्याग्रस्त ग्राहकांना छोट्या-छोट्या तक्रारींसाठीही नजीकच्या ‘बीएसएनएल’ कार्यालयातच जावे लागत आहे.

निविदा प्रक्रिया सुरू
पुण्याच्या कॉल सेंटरशी कंत्राटावरून काही अडचणी उद्भवल्याने टोल फ्री क्रमांक आणि तक्रारीच्या विंडो बंद आहेत. त्यामुळे त्याबाबतची नवीन टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-नितीन महाजन, सहायक महाव्यवस्थापक, बीएसएनएल

नाशिक बीएसएनएल कार्यालयाला देशभरातील द्वितीय दर्जाच्या 107 महानगरांमधून ‘बेस्ट मेन्टेन टेलिकॉम डिस्ट्रिक्ट’ म्हणून नुकताच पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे एकीकडे सर्व तक्रार यंत्रणा ठप्प, तर दुसरीकडे असे पुरस्कार जाहीर होत असल्याने नागरिकांमध्ये ‘बीएसएनएल’च्या सेवेबाबत अधिकच संभ्रम निर्माण झाला आहे.