आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जल्ह्यात‘बीएसएनएल’चे २५ टॉवर्स नादुरुस्त, यंत्रणा विस्कळित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारतसंचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) नाशिक जिल्ह्यातील 25 टॉवर्स नादुरुस्त असल्याने जिल्हाभरातील बीएसएनएलची संपूर्ण यंत्रणाच विस्कळित झाली आहे. या नादुरुस्त 25 टॉवरपैकी नाशिक महानगरातील टॉवरची संख्या 14 असून, त्यामुळे महानगरातील बीएसएनएल ग्राहकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बीएसएनएलच्या ग्राहकांना गत तीन महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात रेंज नसणे, कॉल्स ड्रॉप आउट, विशिष्ट भागातील भ्रमणध्वनी आउट ऑफ कव्हरेज लागण्याचे प्रकार वाढल्याने नागरिकांना या सेवेच्या उपयोगापेक्षा त्याचा मानसिक क्लेश अधिक होते आहे. अन्य कंपन्यांकडून ‘फोर जी’ची तयारी सुरू असताना बीएसएनएलला स्वतःच्या टुजी सेवेची देखरेख ठेवणेदेखील जमत नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे.