आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएलचे माेफत वायफाय अाैटघटकेचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यातभाविकांना वायफाय सेवा मिळावी यासाठी बीएसएनएलने (भारत दूरसंचार निगम) शहरातील चार ठिकाणी हाॅटस्पाॅट लावले मात्र, ही महत्वाकांक्षी सेवा अाैटघटकेची ठरू पाहते अाहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने वायफाय अॅक्सेस करणाऱ्या बहुतांश मोबाइलधारकांच्या पदरी निराशा पडते आहे. विशेष म्हणजे या सेवेच्या उद‌्घाटनाला आठवडा उलटला असला तरीही, अद्याप तपोवनातील हॉटस्पॉट कार्यरत झालेला नाही.
अायडिया, एअरटेल, वोडाफाेन, रिलायन्स अशा खासगी कंपन्यांमुळे दूरसंचार क्षेत्रात तीव्र स्पर्धा निर्माण झाली अाहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएलचेही प्रयत्न सुरू अाहेत. एवढेच नव्हे तर, राज्यातील पहिले वायफाय शहर नाशिक असेल, अशी घोषणादेखील बीएसएनएल प्रशासनाने पाच जुलैला वायफाय सेवेच्या शुभारंभाप्रसंगी केली हाेती. मात्र सेवेच्या शुभारंभानंतर अवघ्या आठवडाभरात या सेवेचे तीन तेरा वाजले अाहेत. नाशिक शहरात पंचवटीतील बीएसएनएल एक्स्चेंजसह रामकुंड, साधुग्राम अाणि लक्ष्मीनारायण मंदिर या चार ठिकाणी हाॅटस्पाॅट लावण्याचे बीएसएनएलचे नियोजन होते. दरम्यान, जे हॉटस्पॉट कार्यरत आहेत त्यासंदर्भातही अनेक तक्रारी समाेर येऊ लागल्या अाहेत. वायफाय कनेक्ट झाल्यानंतर कधी अत्यंत धिमी गती तर कधी वायफायमध्येच खंडित होते. त्यामुळे डाउनलोडिंग वा चॅटिंग मध्येच थांबते. बीएसएनएलने तक्रारींचे निराकरण केल्यास ही सेवा अाैटघटकेची ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवीन३२ पैकी अवघे १८ टाॅवर्स कार्यान्वित कुंभमेळ्यातविनाअडथळा नेटवर्क मिळावे म्हणून बीएसएनएलने शहरात नवीन ३२ टाॅवर्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून टाॅवर बसविण्याचे काम सुरू अाहे. अातापर्यंत केवळ १८ टाॅवर्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे सेवेतील तक्रारी अद्याप कायम आहेत.

सेवेतील अडचणी लवकरच दूर करू
ग्राहकांनासुरळीत सेवा देण्यासाठी बीएसएनएल प्रयत्नशील अाहे. त्यामुळेच कुंभमेळ्यानिमित्त नाशिकला वायफाय सिटी बनविण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. कदाचित सर्व्हर डाउन झाल्यामुळे वायफाय स्लाे-डाउन झाले असेल. चाैकशी करुन त्रुटी दूर केल्या जातील. -सुरेश बाबू प्रजापती, महाप्रबंधक,बीएसएनएल, नाशिक.

ग्राहकांची एक प्रकारे अार्थिक लूटच
बीएसएनएलनेसुरू केलेली वायफाय सुविधा ही पहिल्या २० मिनिटांसाठी दररोज मोफत असेल. त्यानंतर ३० रुपयांच्या रिचार्जद्वारे ३० मिनिटे वायफाय वापरता येईल. तसेच, ५० रुपयांत ६० मिनिटे, ९० रुपयांत १२० मिनिटे, तर १५० रुपयांत एक दिवस वैधता राहील. बहुतांश लाेकांनी वायफायसाठी रिचार्ज केले अाहे. मात्र, वेळेवर हाॅटस्पाॅटच सर्च हाेत नसल्याने त्यांना नाहक अार्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ग्राहकांची ही एक प्रकारे अार्थिक लूटच सुरू अाहे.