आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BSNL's Landline, Mobile Service Dismantal In Panchavati

'बीएसएनएल'ची लँडलाइन, माेबाइल सेवा पंचवटी परिसरात विस्कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - 'बीएसएनएल'चीलँडलाइनसह मोबाइलची सेवा पंचवटी परिसरात विस्कळीत झाल्याने अनेक ग्राहकांनी त्यांच्याकडील सेवा बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे. ग्राहक केंद्राकडून ग्राहकांची हेळसांड होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून सातत्याने तक्रारी येत असतानाही बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होत नसल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

पंचवटीत काही दिवसांपासून बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाली आहे. चार-चार वेळा कॉल करूनही फोन लागत नाही. सर्वाधिक त्रास हा कॉल ड्रॉपचा असल्याच्या तक्रारी आहेत. पंचवटी परिसरात सर्वाधिक कृषी प्लॅनधारक शेतकरी आहेत. मात्र, बीएसएनएलने या योजनेत कपात केल्याने अनेकांनी ही योजना बंद केली आहे. बीएसएनएलच्या अन्य पोस्टपेड, प्रीपेड योजनाधारकांनाही विस्कळीत सेवेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहकसंख्या असूनही कंपनीकडून ग्राहकांची हेळसांड सुरू आहे. ग्राहक सेवा केंद्राकडूनही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने मोबाइलधारक वैतागले आहेत. इंटरनेट सेवेचा डेटा वापराविना कपात होत असल्याने अतिरिक्त डेटा पॅक टाकण्यासाठी ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत अाहे.

अन्यथा सिमकार्ड फेको आंदोलन
सेवा सातत्याने विस्कळीत असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. ग्राहक सेवा केंद्रातही मार्गदर्शन केले जात नाही. सेवा सुरळीत झाल्यास कार्यालयासमोर सामूहिक सिम कार्ड फेको आंदोलन केले जाईल.योगेश नाटकर, मराठा महासंघ