आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकरोड- बुद्धगयेतील बॉम्बस्फोटांच्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या विविध गटांनी सोमवारी वेगवेगळ्या मार्गाने जाहीर निषेध केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने नाशिकरोड स्थानकावर भुसावळकडून मुंबईकडे जाणारी पॅसेंजर अडविण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, सुनील कांबळे, शंकरराव काकळीज, अमोल पगारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी प्रियकीर्ती त्रिभुवन, पवन क्षीरसागर, ललित पाटील, विक्रांत निकम, प्रमोद बागुल आदी उपस्थित होते. भीमशक्ती व प्रबुद्ध मित्रमंडळाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय पगारे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक-पुणे महामार्गावरील दत्त मंदिर चौकात रास्ता रोको करण्यात आला. तुषार दोंदे, अमोल कदम, कपिल भालेराव, मनीष नेटावटे, मोनू खडताळे, किरण साळवे आदींनी आंदोलनात भाग घेतला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करून विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष सुनील वाघ यांच्या नेतृत्वाखाली फकिरा जगताप, संजय भालेराव, दिलीप दासवाणी, चंद्रकांत भालेराव आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोर्चा काढून विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले. रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाप्रमुख प्रकाश बागुल यांच्या नेतृत्वाखाली संजय बोर्हे, रविकांत भालेराव, बापू लोखंडे आदींनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले.
भाजपची आज निदर्शने
बुद्धगयेतील साखळी स्फोटांच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजपच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. सोमवारी सकाळी भाजपची बैठक होऊन महाबोधी मंदिरात झालेल्या स्फोटाच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. सायंकाळी 7 वाजता फाळके स्मारकात प्रार्थना सभा घेण्यात आली. मंगळवारी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करण्याचे ठरले. या वेळी शहर उपाध्यक्ष कुणाल गायकवाड, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, दीपक शेवाळे आदींनी या घटनेचा निषेध केला. बैठकीस लक्ष्मण सावजी, सुनील केदार, सुरेशअण्णा पाटील, बाळासाहेब सानप, दिगंबर धुमाळ, सुरेश मानकर आदी उपस्थित होते.
विविध संघटनांकडून स्फोटांचा निषेध
बुद्धगयेतील दहशतवादी हल्ल्याचा शहरातील विविध धार्मिक आणि राजकीय संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त करत देशातील बौद्धांच्या धार्मिक स्थळांना सुरक्षा देण्याची मागणी केली. सोमवारी विविध संघटनांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. यात सम्यक माहिला व बालविकास केंद्र, फुले-शाहू- आंबेडकर विचार मंच (टागोरनगर), रिपब्लिकन सेना यांचा समावेश आहे. भीमशक्ती संघटनेचे माजी महापौर अशोक दिवे, अविनाश आहेर, जगदीश पवार यांच्यसह पदाधिकार्यांनी निवेदन देत दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी गर्दी झाली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.