आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'लखोबा\': प्रेयसीच्या मदतीने बिल्डरने भावी पत्नीची बदनामी करून मोडला विवाह!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे/नाशिक- वाग्दत्त वधूबाबत बदनामी करणारी खोटी माहिती आपणच फोनवरून पसरवत नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकाने साखरपुड्यानंतर स्वत:चेच लग्न मोडले. श्रीराम मालपुरे असे या व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने प्रेयसीच्या मोबाइलद्वारे, आवाज बदलून हे कारनामे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी श्रीराम मालपुरेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहाडी प्र. डांगरी येथील तरुणीचा विवाह कळवण तालुक्यातील ओतूर येथील श्रीराम प्रकाश मालपुरे याच्यासोबत ठरला होता. हा तरुण नाशिक येथे बांधकाम व्यावसायिक आहे. दोन्हीकडील मंडळींनी संमतीने जून लग्नाची तारीख ठरली होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून या तरुणीच्या कुटुंबीयांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन येत होते. 'तुमची मुलगी त्या घरात देऊ नका', असे या फोनवरून सांगण्यात येत होते. शिवाय या तरुणीच्या चारित्र्यावर पलीकडून बोलणारी व्यक्ती वारंवार संशय निर्माण करत होती. मुळात हे फोन श्रीराम मालपुरे हाच वेगवेगळ्या सिमकार्डचा वापर करून करत होता. स्वत:चे पूर्वीचे प्रेमसंबंध लपवून त्याने या तरुणीची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय तरुणीच्या काही नातलगांकडेही फोन करून तिची बदनामी केली. तसेच लग्न करण्यासही नकार देऊन फसवणूक केली होती.

हा प्रकार 21 एप्रिल 2015 ते 19 मे 2015 दरम्यान घडला. शिवाय लग्न मोडण्यास तो स्वत: कारणीभूत ठरला, असा ठपका मुलीच्या वडिलांनी ठेवला आहे. याप्रकरणी श्रीरामविरोधात सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, पी. एस. दराडे, राजेंद्र पाटील, सुधाकर शेंडगे तपास करीत आहे.
तरुणीचे धाडस-

बीएस्सी पदवीधर असलेल्या तरुणीशी श्रीराम मालपुरेचा विवाह होणार होता. मात्र त्याचे खरे रूप कळल्यानंतर या तरुणीने व्यथित होता, अशा व्यक्तीला चांगलाच धडा शिकवण्याचे ठरवले. वारंवार येणाऱ्या फोनमुळे ती त्रासली होती. अखेर श्रीरामविरोधात तिने पोलिसांत तक्रार दिली.
सिमकार्ड प्रेयसीच्या नवऱ्याचे-
पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीराम स्वत:चे लग्न मोडण्यासाठी प्रयत्नशील होता. प्रेयसीच्या मोबाइलमध्ये वारंवार सिमकार्ड बदलून तोच असे फोन करत होता. त्यासाठी त्याने काही वेळा प्रेयसीचाही मोबाइल वापरला. हा मोबाइल सिमकार्ड त्याच्या प्रेयसीच्या पतीच्या नावे असल्याचे समोर आले; परंतु प्रेयसी तिच्या पतीची या प्रकरणात काहीही भूमिका नाही, असे सांगण्यात आले. मात्र सिमकार्डचा वापर झाल्यामुळे तिसरी व्यक्तीही अडचणीत आली आहे.
प्रेयसीची भूमिका गुलदस्त्यात-

श्रीराम मालपुरेवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. या प्रकरणात त्याच्या प्रेयसीची भूमिका अजून समोर आलेली नाही. त्याच्या कुटुंबातील इतरांची या प्रकरणात भूमिका नाही. - धनंजय पाटील, पोलिस अधिकारी, सोनगीर ठाणे