नाशिक - टीडीआरबाबत नवीन धाेरण राज्य शासनाने जाहीर केले आहे. यात नऊ मीटरखालील रस्त्यावरील भूखंडावर टीडीआर वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे या रस्त्यालगत नवीन इमारती उभारताना वा पुनर्विकासात अडचणी येणार असून, प्रामुख्याने ताे छाेट्या बांधकाम व्यावसायिक स्वत:करिता जागा विकसित करण्यापुरता मर्यादित असणार आहे. दुसरीकडे मीटरपुढील रस्त्यालगतच्या इमारतींना जादा टीडीआर वापराची परवानगी दिल्याने अशा रस्त्यांवर माेठे बांधकामे उभारणार्या बड्या व्यवसायांसाठी ‘अच्छे दिन’ येणार असल्याचे चित्र आहे.
राज्याच्या नगररचना विभागाने नुकतेच टीडीआर धाेरण जाहीर केले असून, त्यावर हरकती सूचनाही मागवल्या जाणार आहेत. तूर्तास यासंदर्भातील अध्यादेशात सहा, सात नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांना टीडीआर लागू हाेणार नसल्याने छाेट्या बांधकाम व्यावसायिकांच्या पाेटात गाेळा उठला आहे. अशा ठिकाणी जुने छाेटे बांधकाम पाडून घरगुती वापराकरिता माेठे बांधकाम करण्यात अडचणी येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शहरातील बहुतांशी बांधकामे अर्थातच जुनी बांधकामे ही सहा, सात नऊ मीटर रस्त्यालगत आहेत. तसेच, अशा रस्त्यांलगत भविष्याचा विचार करून माेकळ्या जागाही खरेदी केल्या आहेत. अशा ठिकाणी नवीन इमारती उभारताना अडचणींचा सामना करावा लागेल, असे चित्र आहे.
माेठ्या रस्त्यांवरील बांधकामांची चांदी : नऊते बारा मीटर रस्त्यावर यापूर्वी एक एफएसआय चाळीस टक्के टीडीआर लाेड करता येत हाेता. आता नवीन धाेरणानुसार त्यात १० टक्के वाढ झाली असून, ५० टक्के टीडीआर लाेड करता येऊ शकेल. बारा ते अठरा मीटर रस्त्यावर एकास ४० असे प्रमाण आहे, त्यात ३५ टीडीआरची वाढ हाेऊन एकास ७५ असे प्रमाण लागू हाेईल. अठरा ते चाेवीस मीटर रस्त्यावर ४० असे प्रमाण असताना त्यात ६० टीडीआरने वाढ झाली असून, आता दाेन टीडीआर वापरता येईल. चाेवीस ते तीस मीटर रस्त्यावर आता एकास ४० या प्रमाणात वाढ हाेऊन २.२५ टीडीआर वापरण्यास परवानगी मिळाली आहे. तीस मीटरपेक्षा अधिक रस्त्यावर आता एकास ४० यात वाढ हाेऊन अडीचपट टीडीआर लाेड करण्यास परवानगी मिळेल.
टीडीआर झाेन रद्द
पूर्वीए, बी, सी डी या वर्गवारीत टीडीआर उपलब्ध हाेते. खासकरून बाजारात सी झाेनमधील टीडीआर माेठ्या प्रमाणात हाेता, मात्र बी झाेनमधील टीडीआरची टंचाई हाेती. आता नवीन धाेरणात टीडीआरचे झाेनिंग रद्द झाल्याने सीमधील टीडीआर दुसर्या वर्गवारीत वापरता येईल. हरित पट्ट्यातील आरक्षणांसाठी टीडीआर मिळणार आहे. मात्र, पालिकेतील काही सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, पूर्वी तपाेवन परिसरातील काही हरित पट्ट्यातील रस्त्यांसाठी एकास वीस याप्रमाणे टीडीआर िदले गेले आहेत.
आरक्षणधारकां बराेबरच पालिकेचाही फायदा
समावेशक आरक्षणाखाली आता महापालिकेला मूलभूत कामांसाठी जागा मिळण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे. यात नवीन धाेरणानुसार खेळाची मैदाने उद्यानांसाठी समावेशक आरक्षणाखाली जागा घेण्याचा मार्ग माेकळा केला आहे. त्यात साधारणपणे ७५ टक्के जागा महापालिकेला द्यावी लागेल, तर २५ टक्के जागा मालकाला विकसनासाठी मिळेल. विशेष म्हणजे, येथे एक हजार चाैरस मीटर जागा विकसनासाठी उपलब्ध असेल तर तेथे दाेन हजार चाैरस मीटरचे बांधकाम करू शकेल. एवढेच नव्हे, तर ७५ टक्के जागेपाेटी विकसकाला दुप्पट टीडीआरही िमळणार आहे. हा टीडीआर त्याला बाजारात काेठेही वापरून फायदाही मिळणार आहे.
नवीन टीडीआर धाेरण असे
गावठाणातील आरक्षण संपादित करायचे असेल तर एकास २.५ इतका टीडीआर अनुज्ञेय असेल. गावठाणाबाहेर असेल तर मात्र एकास इतका टीडीआर दिला जाईल. रस्त्याबाबत गावठाणात २.२० इतका टीडीआर दिला जाईल, तर गावठाणाबाहेर १.८५ इतका टीडीआर अनुज्ञेय असेल.
नागरिकांचा हाेणार फायदा
टीडीआर वापरण्याबाबतचे धाेरण बदलल्यामुळे लाेकांचा फायदा हाेणार आहे. जास्त बांधकाम करण्यास मुभा मिळेल. एवढेच नव्हे, तर समावेशक आरक्षणाखाली उद्यान खेळाची मैदाने संपादित करण्याची प्रक्रिया गतिमान हाेईल यात मालकाचाही फायदा हाेणार आहे. यासंदर्भात धाेरण प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती सूचना येतील त्यानंतर अंतिम निर्णय हाेईल. विजयशेंडे, सहायक संचालक, नगररचना विभाग