आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या नाशकातील वाड्याची भिंत पडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - जुन्यानाशकातील तांबट लेन परिसरातील एका तीनमजली वाड्याची धोकादायक भिंत शनविारी दुपारी काेसळली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आठवडाभरापूर्वीच मेनरोड परिसरातील भिकुसा लेनमधील जुना तीनमजली वाडा काेसळला होता. एकापाठोपाठ दोन घटना घडल्याने जुन्या धाेकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एेरणीवर अाला अाहे.
नरेंद्र दिलीप मंुदडा यांच्या मालकीच्या ६० ते ६५ वर्षांपूर्वीच्या वाड्याची भिंत अचानक माेठा आवाज हाेऊन कोसळली. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी असलेल्या शविकुमार गुप्ता यांच्या वाड्यातील साहित्य काढून घेतल्यानंतर या धोकेदायक भिंतीचा टेकू निघाला होता. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह ‘भद्रकाली’च्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले.