आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामटवाडेत मध्यरात्री गुंडांचा धुडगूस; जाळल्या तीन दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - नववर्षाच्या प्रारंभी कामटवाडे भागात पुन्हा जळीत प्रकरणाने तोंड वर काढले अाहे. समाजकंटकांनी येथील बंदावणेनगरातील एका घरासमोरील तीन दुचाकी जाळल्या तसेच घरही जाळण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या जळीत प्रकरणाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले.
शुक्रवारी पहाटे २-३ वाजेच्या सुमारास बंदावणेनगरातील अभिनव रो-हाउस सी- येथे रमेश दळवी यांच्या घरासमोरील तीन दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्यात अाल्या. दुचाकीवर अालेल्या १०-१२ गुंडांनी हा प्रकार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या वाहनांनी पेट घेताच त्याची आग घरात पसरली. ही वाहने पेटविताना या गुंडांनी दळवी यांच्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून घेतली होती. त्यामुळे दळवी कुटुंबाला बाहेर येता अाले नाही. त्यांची आरडाओरडा ऐकून शेजारी जागे झाले. त्यांनी पाणी टाकून तत्काळ आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक दलानेही घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. या सर्व प्रकरणात तीन दुचाकी जळून खाक झाल्या, तर घरातील फर्निचरसह सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. मात्र, दळवी कुटुंब आगीमुळे घाबरून गेले होते. सर्वांना धुराचा त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी राकेश दळवी यांच्या फिर्यादीनुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पंकज सोनवणे, राहुल गोतिसे, विजय काचे, योगेश पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी भेट दिली.

कडक कारवाई
^आपआपसातील वादातूनहा प्रकार घडला आहे. याबाबत गुन्हा दाखल केला असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास केला जाईल. असा प्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. अतुल झेंडे, सहायकपाेलिस आयुक्त.

दुर्देवी प्रसंग
^आमच्या कुटुंबावर बेतलेला अागीचा हा प्रसंग दुर्दैवी आहे. काहीही चूक नसताना अामच्या कुटुंबाला हा त्रास सहन करावा लागला. राकेश दळवी, युवक

जीव वाचला
^आम्हीसर्वकुटुंब झोपेत असताना हा प्रकार झाला. गुंडांना आमचे घर जाळायचे असावे. सुदैवाने आम्ही जिवंत आहोत. या गुंडांवर कडक कारवाई करावी. - शोभा दळवी

आग पाहताच विझविण्यासाठी प्रयत्न केला
^हा सर्व प्रकारची आरडाओरड ऐकून मी बाहेर आलो. आग लागलेली पाहताच प्रथम ती विझविण्यासाठी प्रयत्न केला. जाळणारे पळून गेले होते. मात्र हा प्रकार पाहून भीती वाटत होती. मनोहर हिरे, प्रत्यक्षदर्शी
टवाळखाेरांवर कारवाई करा
^सिडकाेतील गुन्हेगारी नियंत्रणात असली तरी पाेलिसांनी दिवसा-रात्रीची गस्त वाढवून समाजमंदिरे, सभागृहांमध्ये बसणाऱ्या टवाळखाेरांवर कारवाई करावी. रात्री उशिरापर्यंत टवाळखाेर परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करतात. त्यांच्याविराेधात हद्दपारी, प्रतिबंधात्मक कारवाई करून शांतता निर्माण करावी. सिडकाेतील जाळपाेळीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सहायक अायुक्त, वरिष्ठ निरीक्षकांची भेट घेत त्यांना सूचना दिल्या अाहेत. अामदार सीमा हिरे

धुरामुळे चिमुकला भयभीत
या संपूर्ण घटनेत रात्री साखरझोपेत असलेला राकेश दळवी यांचा अडीच वर्षांचा मुलगा प्रफुल्ल हा अतिशय घाबरला होता. अागीमुळे घरात धूर पसरल्याने अाईने त्याला बाहेर अाणले. धुरामुळे त्याला गुदमरल्यासारखे झाले तसेच त्याचा चेहरा काळा पडला हाेता. धुराचा त्रास झाल्याने ताे रडत हाेता.
कामटवाडेतील बंदावणेनगरात राकेश दळवी यांच्या तीन दुचाकी शुक्रवारी मध्यरात्री समाजकंटकांनी जाळल्या.